प्रथमच एकत्र दिसणार आमिर आणि रणवीर चित्रपट कि जाहिरातीत ?

मुंबई : प्रतिनिधी

मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानचं नाव आज सगळीकडे गाजतंय. कोणत्याही व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यात तरबेज असणाऱ्या आमिरच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनेता रणवीर सिंहही वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटामध्ये सर्वांनाच त्याचा प्रत्यय आला आहे. नकारात्मक भूमिकेतही रणवीरच जास्त भाव खाऊन गेला. व्यावसायिक पातळीवर रणवीर यशस्वी झाला आहेच, पण वैयक्तिक बाबतीतही इंडस्ट्रीतील सर्वांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आमिरसोबतही रणवीरची चांगली मैत्री आहे, पण दोघेही अद्याप कधीही एकत्र दिसले नाहीत, पण आमिर-रणवीरच्या चाहत्यांची ही इच्छाही लवकरच पूर्ण होणार आहे.

होय, आमिर आणि रणवीर लवकरच एकाच फ्रेममध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘पद्मावत’मध्ये अलाउद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा लीलया साकारणारा रणवीर सध्या झोया अख्तरच्या ‘गल्ली बॅाय’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. आमिरही अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कतरीना कैफसोबत ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चं शूटिंग पूर्ण करतोय. याच दरम्यान हे दोघेही एका चित्रपटासाठी नव्हे तर जाहिरातीसाठी एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोघेही एका जाहिरातीत एकत्र काम करणार आहेत. दोघेही सध्या आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्यांनी या जाहिरातीसाठी दोन महिन्यांनंतरची तारीख दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ही जाहिरात नेमकी कशाची असेल आणि याशिवाय या दोघांसोबत बॅालिवुडमधील आघाडीचे इतरही कलाकार आहेत का? याबाबतची माहिती सध्या गुप्त ठेवण्यात येत आहे. योग्य वेळ येताच ती देखील समोर येईल असं सांगितलं जात आहे.

 

About Editor

Check Also

पार्श्वगायिका आशा भोसले, यांचा आवाज अखेर कायमचा शांत ब्रीच कँडी रूग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पार्श्वगायिका आणि आपल्या अमोघ वाणीने सर्व रसिकांच्या मनाला भूरळ घालणाऱ्या आशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *