यंदाच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची धुरा संगीत रंगभूमीच्या अभिनेत्रीकडे किर्ती शिलेदार बनल्या ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा

मुंबई : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीच्या धामधुमीनंतर निवडून आलेल्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत आज ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यंदाच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

जयमाला आणि जयराम शिलेदार यांच्या कन्या असणाऱ्या किर्ती यांनी आपल्या बहारदार आवाज आणि अभिनयाच्या बळावर संगीत रंगभूमी गाजवली आहे. ‘लाजविले वैऱ्यांना…’, ‘हरीची ऐकताच मुरली…’, ‘प्रभू आजी गमला…’, ‘खरा तो प्रेमा ना धरी…’, ‘मम सुखाची ठेव…’ यांसारख्या किर्ती यांनी गायलेल्या बऱ्याच संगीतरचना गाजल्या आहेत. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसोबतच यंदाचं नाट्यसंमेलन जून महिन्यात मुंबईमध्ये होणार असल्याचंही यावेळी घोषित करण्यात आलं आहे. १३ ते १५ जून या कालावधीत हे नाट्यसंमेलन होणार असल्याचे संकेत मिळाले असले तरी अद्याप तारखा निश्चित करण्यात आल्या नसून त्याबाबतची अधिकृत माहिती लवकरच घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

About Editor

Check Also

सहसचिव सुजाता शर्मा यांची स्पष्टोक्ती, पेट्रोल—डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही अफवांवर विश्वास ठेवू नका

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) सहसचिव सुजाता शर्मा यांनी बुधवारी (२५ मार्च २०२६) सांगितले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *