सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांची अखेर बदली अतिरिक्त कार्यभार संजीव पलांडे यांच्याकडे

मुंबई : प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संजीव पलांडे यांची नियुक्ती झाली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकाप्रमाणेच लेखक म्हणूनही पचिचीत असणाऱ्या पाटील यांनी काही सिनेमांच्या कथाही लिहिल्या आहेत. पाटील यांनी मे २०१६ मध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. परंतु विक्रीकर आयुक्तालय या त्यांच्या मूळ खात्याकडून वारंवार तगादा लावून त्यांना आपल्या सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर सांस्कृतिक कार्य खात्याने त्यांना संचालक पदावरून मुक्त केले असून या जागेवर पलांडे यांची नियुक्ती केली आहे.

संजीव पलांडे हे सध्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी सांभाळत असून आता त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी पलांडे यांनी स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *