डोमेन एक्स्पर्ट कमिटीच्या अध्यक्षपदी अभिनेते दीपक करंजीकर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केली नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, अभिनेते आणि नाट्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांची ‘डोमेन एक्स्पर्ट कमिटी’वर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डाॅ. महेश शर्मा यांनी केली आहे. हे अध्यक्षपद केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरचं आहे. सांस्कृतिक प्रभागाच्या योजना सचिवालयाने भारतातील सांस्कृतिक चळवळीचा इतिहास, शोध आणि संवर्धनासाठी एक योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी जाॅईंट सेक्रेटरी  (आयजीएनसीए) यांच्याकडे योजना निर्देशकाचा भार सोपवण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत ‘डोमेन एक्स्पर्ट कमिटी’ नियोजित कार्याची आखणी करणे, ती प्रत्यक्षात कार्यान्वित करणे वगैरे कामे योजना सचिवालयाशी संपर्क करून पूर्णत्वास नेईल. ही योजना हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ‘डोमेन एक्स्पर्ट कमिटी’चे अध्यक्ष दीपक करंजीकर हे केंद्रीय सांस्कृतिक सचिवांना थेट रिपोर्ट करतील. या नियुक्तीने दीपक करंजीकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

About Editor

Check Also

चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव या कलावंताना जाहिर, तसेच विशेष योगदान पुरस्कार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार; प्रसाद ओक व राणी मुखर्जी यांचा विशेष योगदान पुरस्काराने गौरव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *