भरत जाधव याने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण कोल्हापुरात स्थायिक होण्याचं भरत जाधव याच कारण आलं समोर

अभिनेते भरत जाधव गेली कित्येकी वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतआहे . त्यांच्या अभिनयाने कित्येक चित्रपट अजरामर ठरले. त्यांनी चित्रपटांसोबतच अनेक नाटकांत अजरामर भूमिका केल्या. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाले. आता मुंबई सोडण्याचा निर्णय त्यांनी का घेतला याचे कारण सांगितले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना भरत जाधव म्हणाला की, ‘आई-बाबांसाठी कायपण म्हणत भरत यांनी थेट मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय. एका मुलाखतीत त्यानं याबद्दल सांगितलंय. ते म्हणाले की, आम्ही कोल्हापूरात जायचो. तेव्हा नेहमी पाहुण्यांकडे उतरायचो. त्यामुळे कोल्हापूर गावात एक स्वत:च घर असावं, अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती.

आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग मी कोल्हापूरात बंगला बांधला आणि भावंडांना तो दाखवला. पण आई-बाबांना दाखवला नाही. बंगल्याचे व्यवहार झाल्यानंतर तिथे मी कुटुंबाला विमानाने घेऊन गेलो. आई-वडिल तिथे राहिले.आता ते नाहीत. त्यांची इच्छा होती की तिथे कोणी पाहिजे म्हणून मी कोल्हापूरात राहतो असं एका कार्यक्रमात बोलताना त्याने सांगितलं होत.

पुढे बोलताना भरत म्हणाला की, ‘आजच्या जीवनात ब्रिदिंग पीरिएड आवश्यक आहे असे मला वाटते. मी आणि माझ्या कुटुंबाने कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मला तेथे छान वाटते. तेथे ताजी हवा आहे. माझा जन्म मुंबईतील आहे, काम मुंबईत आहे, मुंबईमुळेच नाव झालं आहे यात काही शंका नाही. मला मुंबई खूप आवडते, पण आता इथून काम करणं गरजेचं राहिलेलं नाही. आता मी काय करतो, कोल्हापूरहून मुंबईला येतो, माझं काम करतो आणि घरी परत जातो.

About Marathi E Batmya

Check Also

Ranveer Singh threat case

Ranveer Singh threat case : आरोपीने व्हॉट्सअॅपवर ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर केला

चित्रपटसृष्टीत धमक्यांचा हा सिलसिला सुरूच आहे. अभिनेता रणवीर सिंगला १० फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअॅपवर एक धमकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *