पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजन

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे.

भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग, त्यांचे सामाजिक कार्य, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, स्त्रीशक्तीचे दर्शन घडविणारे नेतृत्व तसेच राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान या कार्यक्रमातून प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे.

नृत्य, संगीत, अभिनय आणि दृश्यरचनांच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या या भव्य प्रस्तुतीतून प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनसंघर्षाचा, प्रशासन कौशल्याचा आणि जनकल्याणकारी कार्याचा अनुभव घेता येणार आहे. ऐतिहासिक आशय आणि कलात्मक सादरीकरण यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुप्रसिद्ध कलावंत शशीन मेस्त्री (नृत्येश्वर) यांनी केले असून, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना आणि कलासादरीकरणाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनाचा वैभवशाली प्रवास रंगमंचावर साकारण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ रसिक, इतिहासप्रेमी, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

Mohe-Lagi-Lagan-SUN-Neo

सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल

सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *