राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरीस ८ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने ‘तिकीटालय’ ॲपवरून या स्पर्धेतील नाटकाची तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य,  इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार सांगितले.

राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण या अंतिम फेरीत होणार असून रसिक प्रेक्षकांना उत्कृष्ट नाट्यकृतींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध नामांकित नाट्यसंस्थांचे आणि निर्मात्यांचे नाट्यप्रयोग होणार आहेत. ८ जून रोजी ‘ठरलंय FOREVER’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार होईल. त्यानंतर ‘सविता दामोदर परांजपे’, ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’, ‘कुटुंब किरैतन’, ‘एकदा असंच पाहावं करून’, ‘करुणाष्टके- उंबरठ्या पलीकडची गोष्ट’, ‘मीमी’ आणि ‘शंकर जयकिशन’ हे नाट्यप्रयोग सादर करण्यात येतील. या सर्व नाट्यकृतींमधून सामाजिक, कौटुंबिक, विनोदी; तसेच समकालीन विषयांचे विविध पैलू रंगभूमीवर उलगडले जाणार आहेत.

मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील व्यावसायिक रंगभूमीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट नाट्यनिर्मितींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यकलेचा दर्जा उंचावणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

स्पर्धेच्या सर्व प्रयोगांसाठी तिकीट दर रुपये ५० आणि रुपये ३० निश्चित करण्यात आले आहे.  प्रत्येक प्रयोगाच्या दोन दिवस अगोदर सकाळी १०,०० वाजल्यापासून ‘तिकीटालय’ या ॲपवर तिकीट विक्री सुरु होईल. या सुविधेचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले.

About Editor

Check Also

Ranveer Singh threat case

Ranveer Singh threat case : आरोपीने व्हॉट्सअॅपवर ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर केला

चित्रपटसृष्टीत धमक्यांचा हा सिलसिला सुरूच आहे. अभिनेता रणवीर सिंगला १० फेब्रुवारी रोजी व्हॉट्सअॅपवर एक धमकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *