उद्धव ठाकरे वसंत मोरेंना म्हणाले, शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे… वसंत मोरे यांच्यासह पाच विभाग अध्यक्ष आणि १७ शाखा अध्यक्षांनी शिवसेना उबाठात प्रवेश

राज्यात कोणे एकेकाळी पुण्यात मनसेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांचे मस्जिदीवरील भोग्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहिर केलेल्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर राज ठाकरे आणि वसंत मोरे यांना मनसेमधून डावलण्यास सुरुवात झाली. मध्यंतरीच्या काळात वसंत मोरे यांचा मनसेशी दुरावा वाढात असताना वसंत मोरे यांना अजित पवार, शरद पवार यांच्याकडून विचारणा झाली. मात्र वसंत मोरे यांनी या सर्वांच्या आग्रहाला नकार देत लोकसभा निवडणूकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. मात्र तेथेही वसंत मोरे यांचे समाधान न झाल्याने अखेर वसंत मोरे हे पुन्हा दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली. दरम्यानच्या काळात वसंत मोरे यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले. त्या भेटीनंतर काही दिवसातच वसंत मोरे यांनी आज शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला.

आज रितसर शिवसेना उबाठा गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, वसंत मोरे हे मध्यंतरीच्या काळात काही पक्षात गेले होते. त्यावेळी तेथे त्यांना मिळणार सन्मान आणि काय वागणूक दिली जाते याचा अनुभव घेतला. त्या अनुभवनामुळे आज ते परिपक्व होत आज स्वगृही परतल्याचे सांगितले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना सोडल्याची तुम्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिक्षा सुनावताना म्हणाले की, पूर्वीपेक्षा अधिक पटीने पुण्यात शिवसेना वाढली पाहिजे हीच तुमची शिक्षा असल्याचे सांगत पुण्याची जबाबदारी एकप्रकारे वसंत मोरे यांच्यावर सोपविली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, इतर पक्षातील अनुभव पाठीशी असल्याने आज तुमचे महत्व वाढले आहे. काम आणि जबाबदारी वाढली आहे असेही यावेळी सांगितले.

वसंत मोरे यांच्यासह पाच विभाग अध्यक्ष आणि १७ शाखाध्यक्षांनी आज शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत संविधान वाचविण्याची लढाई लढलो, त्यात आपण विजयीही झालो. आता लढाई विधानसभेतील खोकेबाजी, लाचारीच्या विरोधात लढाई लढायची आहे. पुणे हे सत्ताबदलाचे केंद्र असणार आहे. एकेकाळी पुण्यात पाच आमदार होते. तो काळ पुन्हा आणायचा आहे असा निर्धार व्यक्त करत पुण्यात बदल घडवून आणण्यासाठी शिवसैनिकांनी तयार रहावे असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *