अखेर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चेविना विधेयक मंजूर

मुंबई : प्रतिनिधी

जवळपास एक वर्षाहून अधिक काळ मोर्चे आणि विविध मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारच्या सत्रात विधानसभेत मांडले. विशेष म्हणजे या हे विधेयक कोणत्याही चर्चेविना सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी विधानसभेतील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी भगवे फेटे बांधले होते. त्यामुळे संपूर्ण अर्धेहून अधिक सभागृह भगवेमय झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात सिध्द झाले आहे. त्यामुळे या समाजाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी त्यांना शासकिय नोकऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याकरीता हे विधेयक मांडत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत विधानसभेत हे विधेयक मांडले.

त्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी या विधेयकाचे एकमताने स्वागत करत असल्याचे सांगत विधेयकाला पाठिंबा दिला.

मुख्यमंत्री फडणवीस हे विधेयक मांडताना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी शिवाजी महाराज की जय आणि एक मराठा लाख मराठा या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *