पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का ? भाजप नेते विनोद तावडे यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
एका वृत्त वाहिनीवर मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, २००४ ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील. हे कोणाला वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन सिंग त्यावेळी राज्यसभेत होते. त्यामुळे ते अचानक पंतप्रधान होऊ शकले. या पवारांच्या विधानाचा संदर्भ देऊन तावडे म्हणाले की, यंदा शरद पवार निवडणूक लढवित नाहीत, पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत. याचाच अर्थ शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे. ती त्यांनी बहुतेक आपल्या मुलाखतीत बोलून दाखविली असावी, असेही ते म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रावादी महागठबंधनचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. तो निवडणूकीनंतर ठरेल. राहूल गांधी यांना पंतप्रधान होण्याची उत्सुकता नाही, असेही शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत म्हंटले आहे. तसेच तुटलेल्या फुटलेल्या महागठबंधन मध्ये मायावती, ममता बॅनर्जी या सर्वांनाच पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. परंतु या महागठबंधन मध्ये असलेल्या गोंधळामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित होत नाही. या परिस्थितीत देशाची जनताही या गोंधळलेल्या महागठबंधनला मतदान करण्याऐवजी एनडीए महायुतीला मतदान करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काल अंमळनेरमध्ये जी घटना भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात घडली ती अतिशय चूकीची आहे. अशी घटना होणे, हे भाजपला शोभणारी नाही. या घटनेमागे काहीही आणि कोणतेही कारण असले, तरीही या पध्दतीची कुठलीही घटना पक्ष खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *