अझीम प्रेमजी फाऊंडेशन व अनन्या संस्थेची आदिवासी भागातील विद्यालयांना मदतीचा हात मूलभूत समस्या सोडविण्यासाठी घेतला पुढाकार

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अंदाड येथे अनन्या फाऊंडेशन व अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असून तेथील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील शाळांसाठी अनन्या फाऊंडेशन आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन अंतर्गत शिक्षण परिषद व मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या प्रमुख एलिना डिसोझा, फातिमा सत्तार मुल्ला, अनन्या फाऊंडेशनच्या प्रमुख अॅना उषा अब्राहम तसेच ३० शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

यावेळी अॅना, फातिमा व एलीना यांनी प्रमुख विषयांवर मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेत पाणी समस्या व विद्यार्थ्यांचे आरोग्य, बालकांचे कुपोषण ग्रामीण भागतील समस्या, शाळेतील मुख्याध्यापकांना भेडसावणाऱ्या समस्या, पालकांची शिक्षणविषयक मानसिकता, विद्यार्थ्यांना देणगीतून मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्याची उपलब्धता अनन्या फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना मिळणारे मध्यान्ह भोजन या विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच विविध उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देसले यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन अंदाड येथील शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दीपिका विशे यांनी केले. सूर्यवंशी, मिलिंद मोगरे यांनी सहकार्य केले.

About Editor

Check Also

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *