वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश, फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे आणि वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवा वन्यपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी दिले निर्देश

नवी मुंबईतील फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि विविध वन्यपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी दिले.

नवी मुंबईच्या डी.पी.एस. तलाव परिसराचे संवर्धन करून फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी पोषक नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासोबतच नेरुळ सेक्टर ५२-ए परिसराचा फ्लेमिंगो कन्झर्वेशन झोनमध्ये समावेश करण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका नेत्रा आशिष शिर्के यांनी यासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने वनमंत्री नाईक यांच्या दालनात झालेल्या बैठकीस नगरसेविका नेत्रा शिर्के, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे अधिकारी रविंद्र मानकर, नवी मुंबई पर्यावरण ग्रुपचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

गणेश नाईक म्हणाले की, नवी मुंबईची ओळख आणि वैभव यामध्ये फ्लेमिंगोचे महत्व अधोरेखित करताना वन मंत्री नाईक यांनी त्यांचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी नवी मुंबईतील फ्लेमिंगो अधिवास असलेल्या परिसराच्या संवर्धनाबाबत भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना गणेश नाईक म्हणाले की, गेल्या ५६ वर्षांपासून माझे नवी मुंबईकडे लक्ष आहे. नवी मुंबईची जडणघडण आणि वैभव टिकले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

गणेश नाईक म्हणाले की, एनआरआय कॉलनी परिसरात सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आढळत असल्यास तो परिसर त्यादृष्टीने संरक्षित ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. फ्लेमिंगो हे नवी मुंबईचे वैशिष्ट्य असून, त्यांच्यासह सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि अन्य वन्यजीवांकडे सिडको व संबंधित अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.

शेवटी बोलताना गणेश नाईक म्हणाले की, डी.पी.एस. तलाव परिसराचे पर्यावरणीय महत्व लक्षात घेऊन तेथील नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन करणे, तसेच नेरुळ सेक्टर ५२-ए परिसरातील वन्यजीवांचे अस्तित्व कायम राहण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

About Editor

Check Also

राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *