Editor

कोल्हापुरी चपलांच्या प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, …

Read More »

पंकज भोयर यांचे आश्वासन, शिक्षक बदली धोरणात महिलांना प्राधान्य देणार ग्रामविकास विभागासमवेत लवकरच बैठक घेणार

राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमध्ये महिला शिक्षकांना प्राधान्य द्यावे, विशेषतः मुलींची संख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये त्यांची नियुक्ती करावी, या संदर्भात ग्रामविकास विभागासोबत बैठक घेतली जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले. सदस्य अरुण लाड यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून या विषयी उपस्थित केलेल्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करा मुंबईच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याची केली मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील …

Read More »

नाशिक कुंभमेळा बोधचिन्ह स्पर्धेसाठी २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची तारीख सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही कृषी योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना विधान परिषदेत माहिती

राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी व अनुदान प्रलंबित असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री भरणे यांनी ही …

Read More »

मतचोरीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात खडाजंगी राहुल गांधी यांचे चर्चेचे खुले आव्हान, तर अमित शाह यांचा काँग्रेसवर मतचोरीचा आरोप

काँग्रेस खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात मतचोरीच्या मुद्यावरून लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. राहुल गांधी यांनी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधील मुद्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान अमित शाह यांना दिले. तर अमित शाह यांनी काँग्रेसवरच मतचोरीचा आरोप केला. अमित शाह… है हिम्मत ❓ pic.twitter.com/kbNNlJxhnQ — Congress …

Read More »

राहुल नार्वेकर यांचे सरकारला निर्देश, घेतलेला टोल परत द्या ई-वाहनांना टोलमाफीची आठ दिवसात अंमलबजावणी करा

राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देत या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य …

Read More »

अजित पवार यांची माहिती, दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

राज्यात एफ.एल–2 आणि सी.एल–3 परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. सदस्य शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार कामगारांची देणी देण्यास निधी कमी पडणार नाही

एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे. राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एस.टी. बसेसची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसची खरेदी केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वाहतूक, इ-चालानबाबत धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगट स्थापणार विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्यावेळी दिले आश्वासन

मुंबई आणि परिसरात वाढती वाहनसंख्या विचारात घेता वाहतूक नियोजनासाठी तसेच वाहनांना इ-चालान देण्याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत विविध राज्य आणि देशांमधील चांगल्या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले. वाहतूक हवालदार खासगी मोबाईलवरून फोटो काढून …

Read More »