Editor

सावध व्हा, सत्तेच्या पाठबळामुळे मनुवाद पुन्हा जोर पकडू लागलाय आरक्षणाबाबत संघाचा पोटशूळ अद्याप कायमच असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दलित, पीडित, शोषीत समाजाच्या अधिकारासंदर्भात पोटशूळ असून आरक्षणासंदर्भातील खदखद संघाच्या प्रमुखांच्या तोंडून वेळोवेळी बाहेर येत असते. मागासांना घटनेने दिलेले आरक्षण संघाच्या डोळ्यात सलत असल्यानेच सरसंघचालक आरक्षणासंदर्भात वेगवेगळी वक्तव्ये करून जाणिवपूर्वक आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत असतात. सत्तेच्या पाठबळामुळे मनुवाद पुन्हा जोर पकडू लागलाय, जनतेने …

Read More »

भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अहवाल पाठविण्याचे नगरविकास विभागाला आदेश लोकायुक्त कार्यालयाचे नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांना आदेश

मुंबईः प्रतिनिधी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेला कनिष्ठ अभियंता कुंदन पाटील यांच्याकडून कायम सेवेत समावून घेण्यासाठी ७ लाख ५० हजार रूपये घेणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश लोकायुक्त कार्यालयाने नगरविकास विभागाला दिले. यासंदर्भात लोकायुक्त कार्यालयाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना …

Read More »

रुग्णवाहिका ठरली चाकावरचे प्रसुतीगृह आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान

मुंबई : प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. १०८ क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे …

Read More »

शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त, तर गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

वाशिम – कारंजा: प्रतिनिधी रोज महाराष्ट्रात ५ ते ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. १६ हजार शेतकरी महिला विधवा झाल्या, त्यांचे संसार उध्वस्त होत आले आहेत. गरीबांना गरीब करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. माणसं फोडण्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करत असून कर्नाटकच्या …

Read More »

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.भामरे, सोमय्या, पोटे-पाटील, गोगावले, कांडलकर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली नियुक्ती

मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), योगेश गोगावले (पुणे) व अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच भाजपा, …

Read More »

कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना तीन पट नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे १ हेक्टर पर्यंत नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांचे ते पीककर्ज माफ करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जच घेतले नाही त्यांना शासकिय मदतीप्रमाणे तीन पट नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पूरग्रस्त भागात करण्यात येत असलेल्या कामाचा आढवा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक …

Read More »

पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी पंतप्रधान आवास योजनेतून मदत पुररेषेच्या आतील निवासी अतिक्रमणांनाही मदत करणार असल्याची मंत्री मुंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल. पुररेषेच्या आतील नुकसान झालेल्या घरांनाही ग्रामविकास विभागाच्या निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करुन देण्याच्या योजनेंतर्गत इतरत्र घर बांधून देण्यासाठी मदत केली जाईल. ग्रामीण भागात नुकसान झालेल्या घरांचा इत्यंभूत आराखडा आठ …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात नाना पटोले यांचा आरोप ; आयुध निर्माणी मध्ये खाजगीकरणाला विरोध

मुंबईः प्रतिनिधी देशभरात खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांमध्ये सुद्धा खाजगीकरणाचा डाव रचला आहे. या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाची सुरक्षाच धोक्यात आणत असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर काँग्रेसला १४४ जागा देण्याची अँड. प्रकाश आंबेडकरांची तयारी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या चार बड्या पक्षांकडून आघाडी-युतीची आणि जागा वाटपाची अद्याप चर्चाच सुरु आहे. मात्र तत्पूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी विधानसभा निवडणूकीसाठीचा राजीनामा जाहीर करत पोलिसांची आठ तासाची ड्युटी करणार तर होमगार्डना पगारी कामगार म्हणून मान्यता देणार असल्याचे आश्वासन अँड.प्रकाश आंबेडकर यांनी दिले. बँलार्ड …

Read More »

सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय असेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे …

Read More »