मुंबईः प्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे, त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदारपदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता नवाब मलिक यांनी वरील आरोप केला. ९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली. त्यावेळी राधाकृष्ण विखे …
Read More »भाजपाचे सरकार कोणताही भेदभाव न करता जनतेची सेवा करेल प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी भाजपाने लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजपा आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही …
Read More »पालिकेच्या जुन्या इमारती आणि पुर्नविकासाच्या करारनाम्यावर नाममात्र शुल्क राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी शहरातील मुंबई महानगरपालिकेच्या जून्या इमारती व चाळींच्या पुर्नविकासाला गती देण्यासाठी यानिमित्ताने होणाऱ्या त्रिपक्षीय करारावर फक्त १००० हजार रूपयांचे नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या जून्या इमारती आणि चाळींच्या पुर्नविकासाला गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारती, चाळींचा पुर्नविकास होता सदर ठिकाणची …
Read More »विखे-पाटीलांच्या मंत्री पदाचा निर्णय कोअर कमिटी घेणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. त्यानुसार अखेर त्यांनी आज आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश लवकरच होईल त्यांना कोणते पालक मंत्रीपद किंवा कोणते मंत्रीपद द्यायचं हे भाजपचे कोर कमिटी निर्णय घेणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …
Read More »विखे-पाटलांचा विरोधी पक्षनेता आणि आमदारकीचा राजीनामा भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार
मुंबईः प्रतिनिधी मागील दिवसांपासून काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सतत झडत होत्या. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची आज दुपारी भेट घेत आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत अहमदनगरमधून पुत्र …
Read More »शासकीय सेवेतील अधिकार्याचे कृत्य लांछनास्पद शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईः प्रतिनिधी भारतीय प्रशासन सेवेतील उपायुक्त पदी असलेल्या श्रीमती निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकून लांछनास्पद भूमिका घेतली आहे. हे कृत्य सक्त कारवाईस पात्र असल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी कार्यरत असणाऱ्या निधी चौधरी …
Read More »खैरेंचा मंत्रीमंडळात समावेश हा शिवसेनेचा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन
औरंगाबादः प्रतिनिधी शिवसेनेचे जेष्ठ नेते यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करायचा की नाही हा शिवसेनेचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे मंत्रीमंडळ तयार केल्यानंतर त्या मध्ये चंद्रकांत खैरेंचा समावेश होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण यावर भाष्य …
Read More »१६% आणि १०% आरक्षण हे वेगवेगळे विषय मेजर जनरल सिन्हो यांचा अहवाल महत्वाचा ठरेल
औरंगाबाद: जगदीश कस्तुरे केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांना दिलेले दहा टक्के आरक्षण यंदा लागू करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील खुल्या प्रवर्गाची प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा याआधी जी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती ती आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात दहा …
Read More »आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
मुंबई : प्रतिनिधी पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या …
Read More »२१७ सदनिकांसाठी २ जून रोजी सोडत सुमारे ६६ हजार अर्जः वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील २१७ सदनिकांच्या संगणकिय सोडतीकरीता ६६ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. रविवारी ०२ जून, २०१९ रोजी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार …
Read More »
Marathi e-Batmya