प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, महापालिकेतील विकासनिधी वाटपात सत्ताधाऱ्यांची दादागिरी विरोधी पक्षातील काँग्रेसशी दुजाभाव पण समाजवादी पक्ष, MIM व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) नगरसेवकांना भरीव निधी, भाजपाचे या पक्षांशी काय हितसंबंध?
मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. विकासनिधी वाटप हे सर्व नगरसेवकांना समान प्रमाणात झाले पाहिजे पण बीएमसीतील सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची अवघ्या काही लाखात बोळवण करण्यात आलेली आहे. महापालिकेतील पैसा भाजपा शिंदेसेनेच्या पक्षाचा निधी नाही तो मुंबईकरांचा पैसा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीत जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद..
बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाशी ठाम भूमिका होती व कार्यकर्त्यांमध्येही दांडगा उत्साह होता म्हणूनच उमेदवार उभा केला होता पण महाराष्ट्राची राजकीय परंपरा, संस्कृती व सभ्यता लक्षात घेऊन सर्वांच्या विनंतीला मान देत दिवंगत नेते अजित पवार यांना आदरांजली देण्याच्या भावनेतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. बारामतीतून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेतला …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, गायमुख ते छत्रपती शिवाजी चौक मेट्रो-१० प्रकल्पाला गती पुढील आठवड्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ९.७ कि.मी. अंतराच्या मेट्रोची निविदा प्रक्रिया
ठाणे–मिरा भाईंदर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गायमुख रेतीबंदर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या मेट्रो-१० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काशीगाव ते दहिसर चेक नाका या महत्त्वाच्या जोडणी नंतर पुढील आठवड्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ९.७ कि.मी. अंतराच्या उन्नत मेट्रो प्रकल्पाची निविदा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती
मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधांकरिता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईसह अन्य महानगरांमध्ये …
Read More »पश्चिम बंगालमध्ये माशांचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी छेडला, मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडून तातडीने प्रत्युत्तर उत्तर देत पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा बरीच माहिती दिली
पश्चिम बंगालमध्ये, बंगाली घरांमध्ये मुख्य अन्न असलेला त्यांचा लाडका मासा स्वयंपाकघरातून थेट निवडणूक प्रचारात पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एका सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपल्या लोकांना पुरेसे मासे खाऊ घालण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केल्यानंतर, हा साधा मासा अनपेक्षितपणे वादाचा मुद्दा बनला. पंतप्रधान मोदी यांनी पुढे …
Read More »हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या इराणच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांचे निधऩ तीन नेत्यांच्या काळात इराणच्या परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेले कमल खराझी याचे निधन
इराणचे माजी परराष्ट्र मंत्री, ज्यांनी एकेकाळी तेहरान अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न करू शकते असे सुचवले होते, त्यांचे गेल्या आठवड्यात झालेल्या हवाई हल्ल्यात जखमी झाल्यानंतर गुरुवारी (९ एप्रिल, २०२६) रात्री निधन झाले, असे इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने वृत्त दिले आहे. कमल खराझी यांनी इराणचे सुधारणावादी अध्यक्ष मोहम्मद खातमी यांचे परराष्ट्र मंत्री म्हणून, आणि …
Read More »अखेर न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात संसदीय चौकशी, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी सुरु होती, मात्र अखेर राजीनामा
न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील शासकिय निवासस्थानाला आग लागल्यानंतर त्या आगीत काही नोटा जळून खाक झाल्याचे दिसून आले. तर काही अर्धवट स्थितीत जळाल्याचे आढळून आले. त्यावरून तत्कालीन सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या विरोधात महाभियोग खटला संसदेत दाखल करण्यात येणार होता. मात्र अखेर न्यायामुर्ती यशवंत …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६ आणि १७ एप्रिलला मुंबईत (diagnostic check) तपासणी होणार – नसीम खान
भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदेसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर …
Read More »आसाममध्ये ८५.०४ टक्के, तर केरळमध्ये ७७.३८ मतदान ४ मेला निकाल होणार जाहिर
गुरुवारी आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये दिवसभर मतदानाला वेग आला, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाच्या आकडेवारीनुसार जोरदार सहभाग दिसून आला. अधिकृत आकडेवारीनुसार, पुदुचेरीमध्ये सर्वाधिक ८९.०८ टक्के, त्याखालोखाल आसाममध्ये ८५.०४ टक्के, तर केरळमध्ये ७७.३८ टक्के मतदानाची नोंद झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील सर्व १२६ विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ८५.०४ टक्के मतदानाची नोंद …
Read More »
Marathi e-Batmya