अंधेरीतील कामगार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सेवा दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी सुरु करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी या विभागाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला पण हा विभागही पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. या रुग्णालयातील सर्व सेवा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. हे रुग्णालय पूर्ववत सुरु व्हावे यासाठी कामगार संघटना पाठपुरावा …
Read More »Taali Web Series : सुष्मिता सेनची वेब सिरीज ‘ताली’ ही तृतीयपंथी गौरी सावंतच्या जीवनावर आधारित
अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘ताली’ (Taali) ही वेबसिरीज रिलीज झाली आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वेब सीरिज ‘ताली’ OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज झाली आहे. ही मालिका तृतीयपंथी गौरी सावंत हिच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेत्री सुष्मिता सेनने गौरीची भूमिका साकारली आहे. …
Read More »Cricket : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडला रवाना
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मंगळवारी सकाळी तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी आयर्लंडला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाच्या आयर्लंडला रवाना झाल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. बीसीसीआयच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने संघाच्या प्रस्थानाच्या चित्रांची मालिका देखील शेअर केली, ज्यात बुमराह, रुतुराज गायकवाड, प्रसिद्ध …
Read More »मुंबई गोवा रस्त्याच्या सिंगल लेनचे काम पूर्ण मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती
मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या ४२ किलोमीटरच्या टप्प्यापैकी २३ किलोमीटरचे सिंगल लेनचे काम पूर्ण झालेले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन मशिनरींच्या साह्याने जोमाने सुरू आहे हे सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी शंभर टक्के …
Read More »सहा महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करणार: इर्शाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली इर्शाळवाडीला भेट
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला. शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यात होईल असा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी …
Read More »सुप्रिया सुळे यांचा विश्वास, दिल्ली समोर महाराष्ट्रा कधीही झुकणार नाही दिड वर्षात अद्यापही महापालिका निवडणुका का घेतल्या नाही?
आज भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण मुंबई विभाग कार्याध्यक्ष राखी जाधव यांच्यासह सेवा दलाचे प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, हरणार की जिंकणार मतदार…. मोदीजी देश कसा एकसंध ठेवणार
देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन असून प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. आपल्या भाषणात दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांची महती सांगत पेटलेलं मणिपूर यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या विळख्यात अडकला होता हे देखील असा आरोप करत पुढच्या वर्षी …
Read More »आयटीआयमध्ये ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन कुशल, रोजगार युक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय)आता व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहे. तसेच कुशल महाराष्ट्र; रोजगार युक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य …
Read More »लाल किल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०२४ ला मीच पुन्हा भाषण करणार आधी महिलांविषयी विचारधारा बदलण्यासाठी मदत तर आता पुन्हा भ्रष्टाचाराची लढाई लढण्यासाठी आशिर्वाद मागितला
गतवर्षी महिलांबद्दल असलेल्या विशिष्ट दृष्टीकोन असलेल्या समुदायाने आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि देशातील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढण्यासाठी आपली साथ हवी अशी साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी लाल किल्ल्यावरून घातली होती. त्यात आज पुन्हा नव्याने काही गोष्टी समाविष्ट करत पुन्हा एकदा यावेळीही आपला काँग्रेस विरोधाचा आलाप आळवत देशातील परिवार वाद आणि भ्रष्टाचाराच्या …
Read More »नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात जाणार? कप्तान मलिक म्हणाले, ते सर्वात आधी… दोन दिवसांनी आराम करून किडनी स्पेशालिस्टला भेटणार
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक यांना नुकताच वैद्यकिय कारणास्तव दोन महिन्याचा जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे सुरुवातीला प्रत्येक गोष्टीसाठी विरोध करणाऱ्या ईडीने नवाब मलिक यांच्या दोन महिन्याच्या जामीन अर्जाला विरोधही केला नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसपासून अर्थात शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत पवार यांचे पुतणे अजित …
Read More »
Marathi e-Batmya