मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर सायन येथील काही कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यावेळी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा आणि मिंदे गटाने रोज माझ्याकडील निष्क्रीय शिवसैनिकाला प्रत्येक आठवड्याला फोडून …
Read More »कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम दर्जेदार आणि वेळेत व्हावे. निकृष्ट कामासाठी संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करा, …
Read More »सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मुंबई अध्यक्ष उल्हास राठोड यांचे निधन ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मुंबई अध्यक्ष उल्हास राठोड यांचे आज दुपारी के ई एम इस्पितळात निधन झाले. अवघ्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परीवार असून उद्या शनिवारी सकाळी १० वाजता दादर चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक …
Read More »गायरान जमीन अतिक्रमणबाबतच्या धोरणास महिन्याभरात अंतिम स्वरूप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आश्वासन
राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘लक्षवेधी’द्वारे मांडलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा सार्वत्रिक प्रश्नावर आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का ? जनतेच्या प्रश्नावर राज्य सरकार आंधळे व बहिरे, विरोधी पक्ष सरकारला जागे करेल
सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत …
Read More »महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आज विधानसभेत निवेदन केले. महिलांची देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका आहे. फिरता निधी दुप्पट …
Read More »गिरणी कामगारांना ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरांसाठी जमीन उपलब्ध करणार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबई शहरात, उपनगरात जागा उपलब्ध नसल्याने सवलतीच्या दरात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी ठाणे जिल्हयातील ४३.४५ हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या जमिनीपैकी २१.८८ हेक्टर जमीन म्हाडामार्फत गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास सुयोग्य आहे, असा अहवाल नुकताच ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला असल्याची …
Read More »बाळासाहेब थोरात यांची मागणी, गिरणी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडवण्याची कालमर्यादा निश्चित करा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते आहे, त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केले. बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला, चिखल तुडवत गेलो…आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही…. इर्शाळवाडी भेटीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अलीकडेच दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला होता. याठिकाणी बचावकार्य सुरु असताना अनेक राजकीय नेत्यांनी इर्शाळवाडीला भेट देत तेथील नागरिकांची भेट घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे विस्थापित झालेल्या आणि नातेवाईक गमावलेल्या कुटुंबियांची भेट घेत मी …
Read More »
Marathi e-Batmya