Breaking News

बोगस बी-बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्याच्या विरोधात नवा कायदा आणणार विधानसभा अध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. यावेळी झालेल्या चर्चेत अनिल …

Read More »

डिजीटल माध्यमासाठी केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासन धोरण स्वीकारण्याचा विचार करेल मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

केंद्र सरकारने डिजीटल माध्यमासाठी काही वेगळे धोरण तयार केले असेल, काही वेगळे निकष ठरवले असतील तर त्याचे अवलोकन केले जाईल आणि त्यानुसार राज्याच्या धोरणात बदल केला जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मंत्री शंभूराजे देसाई उत्तर …

Read More »

मणिपूर प्रश्नी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय !

मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती …

Read More »

‘फार्मसी’च्या विद्यार्थ्यांनाही आता ‘कॅरी ऑन’चा लाभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार्मसी कौन्सिलकडील पाठपुराव्याला यश

फार्मसी पदविकेच्या ‘उन्हाळी परीक्षा २०२३’च्या प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. याप्रश्नी लक्ष घालून काही तरी सकारात्मक तोडगा काढण्याचे साकडे राज्यातील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घातले होते. याप्रश्नी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य मुंबईसह राज्यभरात खड्ड्यांचे साम्राज्य, खड्डेमुक्त रस्त्यांचे काय झाले?

महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण अजूपर्यंत सर्व्हे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे. सरकार केवळ घोषणा मागून घोषणा करत आहे. ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे तर अंमलबजावणी …

Read More »

अजित पवार यांनी निधी वाटपाचे सुत्र सांगताच एकच उसळला हशा…अखेर बहिण-भावाचे नाते… यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांनी अजित पवार यांना धारेवर धरले

मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्य सरकारच्या पुढील खर्चाच्या अनुषंगाने अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर केलेल्या मांगण्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांना विकास कामांसाठी देण्यात येणाऱ्या निधीबाबतच्या उठलेल्या चर्चांवर बोलताना अजित पवार यांनी विधानसभेत एक वक्तव्य केले …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे टीकास्त्र, पंतप्रधान मोदी INDIA ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणतायत… मात्र मणिपूरप्रश्नी पंतप्रधान आजही संसदेत बोलायला तयार नाहीत

जवळपास अडीच महिन्यापासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात उफाळलेल्या हिंसाचार काही केल्या शमायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस मणिपूरमधील हिंसाचाराच्या नवनवीन घटनांचे व्हिडिओ आणि माहिती बाहेर येत आहे. त्यातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवसापासून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मणिपूरप्रश्नी चर्चेची मागणी केली. मात्र काल गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन, अधिवेशन संपताच स्थापन करू

विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर पुन्हा निवडणुका लागणार आहेत. नवीन आमदारांसाठी या कमिट्या महत्वाच्या आहेत, या कमिट्या गठीत करण्याचे निर्देश देऊन अधिवेशन संपताच …

Read More »

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन, पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार प्रत्येक गावात अंमलबजावणी करणार

ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांना चिमटा, आज तुम्ही तिकडे जाऊन बसला नाहीतर तुम्ही…. भविष्यात पायाभूत प्रकल्प निर्माण करत असताना पर्यायी व्यवस्था करण्याच्या अध्यक्षांकडून मंत्र्यांना सूचना

नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री महोदय सांगतात ऑगस्ट २०२४ पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात काँग्रेस …

Read More »