Breaking News

अशोक चव्हाण यांचा सवाल, अहमदाबादसाठी १८ विमाने; राज्यांतर्गत फक्त १५ का? महाराष्ट्रातील विमानसेवांवर अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज १८ विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम १५ विमानसेवा का? असा सवाल काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. राज्यातील विमानतळांची दूरवस्था आणि विमानसेवेबाबत त्यांनी आज विधानसभेत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी मांडली. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांचे प्रश्न …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, इर्शाळवाडी घटनेत ५ लाखांची मदत अत्यल्प; गावांचे पुनर्वसन करा सत्तेच्या मस्तीमुळेच सरन्यायाधीशांवरही बोलण्याची भाजपा आमदाराची हिम्मत

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इर्शाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इर्शाळवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा मंत्री लोढा यांना इशारा, २४ तासात रिकामे करा अन्यथा… पालकमंत्र्यांचा पालिकेशी संबध काय?

राज्यात सत्तापालट होऊन जवळपास एक वर्ष झाला. तसेच मुंबई महापालिकेची मुदत संपून त्यासही कालावधी लोटला. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या जीवावर सुरु आहे. त्यात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेच्या दालनात कार्यालय थाटल्याची माहिती पुढे आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा नेते …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, शिर्डी विमानतळाचा विकास आणि लँडिंग कधी सुरु होणार? नव्या टर्मिनल सह नाईट लँडिंगची सुविधाही तातडीने सुरू करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

साई भक्तांना प्रवास सोयीचा व्हावा म्हणून शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असूनही शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिर्डी विमानतळ अनेक संकटांचा सामना करत आहे. नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी होऊन चार महिने उलटले तरीही ही सुविधा सुरू झालेली नाही याचं नेमकं कारण काय? असा सवाल …

Read More »

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारले तर या व्हॉट्सॲपवर नंबरवर करा तक्रार पहिवहन विभागाकडून व्हॉट्स अॅप नंबर जारी

शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे. मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून …

Read More »

मणिपूर येथील घटनेचे राज्य विधिमंडळात पडसाद, काँग्रेसचा सभात्याग काँग्रेसच्या महिला आमदारांकडून गोंधळ

मागील दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूरमधील हिंसाचार धुमसत असताना त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही भाष्य केले नाही की, हिंसाचार थांबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यातच मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर गॅगरेप केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशातील विरोधी पक्षांसह परदेशातून मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारवर टीका सुरु झाली. …

Read More »

धनंजय मुंडे यांची घोषणा; शेतकऱ्यांसाठी डॅशबोर्ड तयार करणार, जोड खतप्रकरणी चौकशी आता व्हॉट्सअॅपवर तक्रार दाखल करता येणार

राज्यातील शेतकऱ्यांना सध्या जोड खतांची खरेदी करावी लागत आहे. मात्र यातील खतांची ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय दुसरे घेता येत नाही. त्यामुळे या जोड खतांमागे व्यापारी, दुकानदार यांचे काही लागेबांधे आहेत असा सवाल करत खत विक्रेत्यांवर कारवाई कऱण्याची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, आदिवासी, आदिम जमातीच्या लोकांना घरे, रोजगार, शिक्षणासाठी कृती आराखडा वनविभागाची जमिन किंवा प्रसंगी राज्य सरकार जमिन खरेदी करणार

आदिवासी समाजामध्ये आदिम जमातींचे मागासलेपण अधिक आहे. त्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाची जमीन उपलब्ध असल्यास ती देण्यात येईल, अथवा विशेष योजना करून जमीन खरेदी करून त्यावर घर तयार करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार …

Read More »

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या त्या मागणीवर पंतप्रधान मोदी काहीसे गोंधळले लोकसभेतील गटनेते अधिरंजन चौधरी यांनी दिली माहिती

जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या थांबायला तयार नाही. या सगळ्या घडामोडीत नुकताच दोन मुलींची नग्न धिंड काढल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. तसेच आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच मागणी केली. …

Read More »

जोड खतांचे गौडबंगल बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभागृहात उघड कृषीमंत्र्यांकडून आश्वासन; कंपन्यांना समज देणार

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने दिली जात आहेत, शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते …

Read More »