Breaking News

निरंजन डावखरे यांची पक्षातून ६ वर्षासाठी हकालपट्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडून घोषणा

मुंबई : प्रतिनिधी निरंजन डावखरे यांना आमदारकीच नाही तर त्यांच्यावर विश्वास टाकून विदयार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देवून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी आजपर्यंत अनेक उपलब्ध जागा आणि संधी देवूनही त्यांनी केवळ संधीसाधूपणामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यांची ६ वर्षासाठी पक्षातून …

Read More »

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांची अखेर बदली अतिरिक्त कार्यभार संजीव पलांडे यांच्याकडे

मुंबई : प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संजीव पलांडे यांची नियुक्ती झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालकाप्रमाणेच लेखक म्हणूनही पचिचीत असणाऱ्या पाटील यांनी काही सिनेमांच्या कथाही लिहिल्या आहेत. पाटील यांनी मे २०१६ मध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या …

Read More »

डोमेन एक्स्पर्ट कमिटीच्या अध्यक्षपदी अभिनेते दीपक करंजीकर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केली नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, अभिनेते आणि नाट्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांची ‘डोमेन एक्स्पर्ट कमिटी’वर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डाॅ. महेश शर्मा यांनी केली आहे. हे अध्यक्षपद केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरचं आहे. सांस्कृतिक प्रभागाच्या योजना सचिवालयाने भारतातील सांस्कृतिक चळवळीचा इतिहास, …

Read More »

राष्ट्रवादीला निरंजन डावखरेंची अखेर सोडचिठ्ठी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला वैतागून दिला राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. वसंत डावखरे यांचे सुपुत्र तथा आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षांतर्गत ठाणे जिल्ह्यातील पक्षातंर्गंत कुरघोडीला कंटाळून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा आज दिला. तसेच उद्या सकाळी भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पक्ष सदस्यत्वाचा आणि …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची काँग्रेसची तक्रार सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा सरकारकडून गैरवापर केल्याचा सचिन सावंत यांचा आरोप

पालघर : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षातर्फे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ता, पैसा,धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग सुरु आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे सराईत दोषी झाले असून त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली …

Read More »

निपा विषाणू आजाराचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी केरळमध्ये उद्भवलेल्या निपा विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही, पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. राज्यात या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच …

Read More »

भाजप सरकारच्या काळात कृपाशंकर सिंह यांचे कुटुंबियही निर्दोष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने सिंह कुटुंबियांना निर्दोष सोडले

मुंबई : प्रतिनिधी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल असलेले काँग्रेसचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यापाठोपाठ आता त्यांचे कुटुंबियांनाही लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालायाने दोषमुक्त ठरवलेले आहे. त्यामुळे राज्याच्या विशेषत मुंबईच्या राजकारणात कृपाशंकर सिंह हे पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली संशयाच्या भोवऱ्यात आणलेल्या व्यक्ती भाजप काळात निर्दोष …

Read More »

बहुत हुई महंगाई की मार, लूटमार करो बंद मोदी सरकार पेट्रोल दरवाढीच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय्य कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. केंद्र आणि राज्य सरकार इंधनावर अवाजवी कर आकारणी करून जनतेची लूट करित आहे. इंधनावरील हे अन्यायी कर आणि अधिभार …

Read More »

मोटार बाईक अँम्ब्युलन्स सेवेतील नव्या वीस मोटार बाईकचे लोकार्पण मुंबईसह राज्यातील इतर भागातही बाईक अँम्ब्युलन्स सुरू होणार

मुंबई : प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अँम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी २० मोटार बाईकचा समावेश करण्यात आला असून, त्याचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात …

Read More »

मुंबई महापालिकेच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांकडून म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा शहरातील पायाभूत सुविधा निर्मितीत अडचण येण्याची मुंबई महापालिकेला भीती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील परवडणाऱ्या घरांचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने आणि म्हाडा इमारतींच्या पुर्नविकास प्रकल्पांना गती देण्यासाठी म्हाडा प्राधिकरणास नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई शहरातील पायाभूत सुविधांबरोबरच महसूलावर परिणाम होणार असल्याची मत व्यक्त करत म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यास विरोध दर्शविला. तसेच …

Read More »