मुंबई : प्रतिनिधी येत्या पंधरा दिवसात मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी जर केली नाही, तर आतापर्यंत सरकारने समाजाचे मूक मोर्चे पहिले आहेत. पण समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा मराठा कृती मोर्चाने दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार संस्थांमुळेच दुधाला हमीभाव मिळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुधाला हमीभाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फुकट दूध देण्याचे आंदोलन सुरु केल्यानंतर आता या मुद्यावर राजकारण ही होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचबरोबर या दोन पक्षांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार संस्थांमुळेच हा वाढीव दर मिळत नसल्यानेच …
Read More »काँग्रेसला अखेर तीन जागा दिल्यानंतरच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी विधान परिषदेसाठी आघाडी झाल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणे तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने देत लातूर आणि परभणीच्या एका जागेची अदलाबदल करत नाशिक, सिंधुदुर्ग आणि वर्धा, अमरावती जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या जागेसाठी आघाडी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. बँलार्ड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन नव्हेतर ऑफलाईन स्कॉलरशिप मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता) प्रलंबित रक्कम वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर …
Read More »लिटरला २७ रूपये द्या अन्यथा भाजपच्या आमदार, खासदारांना फुकट दुध देणार गरज पडल्यास शहरांचा दुध पुरवठा रोखण्याचा संघर्ष समितीचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी दुधाला सरकारने जाहीर केल्या प्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. जर राज्य सरकारने २७ रूपये लिटरला दुधाचा भाव न दिल्यास हेच दूध भाजपच्या आमदार आणि खासदारांना फुकट वाटप करणार असल्याचा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे …
Read More »कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी आता २० मे पर्यंतची मुदत वन टाईम सेटलमेंटसाठी ३० जून पर्यंतची मुदतवाढ
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून २० मे २०१८ अशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. १ मे ऐवजी आता २० मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. वन टाइम सेटलमेंट …
Read More »‘वाघेऱ्या’ गावात विनोदवीरांचं त्रिकूट विनोदाचे मिशन फत्ते करण्यासाठी किशोर कदम, भारत गणेशपुरे आणि नंदकिशोर चौगुले
मुंबई : प्रतिनिधी विनोदी सिनेमांचा एक वेगळा चाहतावर्ग असतो. त्यामुळेच विनोदी सिनेमांची लाट कधीच ओसरत नाही. रुपेरी पडद्याच्या माध्यमातून चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात यशस्वी होणाऱ्या कलाकारांना प्रेक्षक डोक्यावर घेतात आणि पुन: पुन्हा त्यांच्या सिनेमांची वाटत पाहतात. ‘वाघेऱ्या’ या सिनेमात प्रासंगिक विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमातील विनोदी …
Read More »सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही : खा. अशोक चव्हाण मोदींना सौदी अरेबियात जाऊन कोकणचा सौदा केला: मोहन प्रकाश
नाणार : प्रतिनिधी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील नाणारवासियांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाची सर्वशक्तीनिशी साथ असून सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन …
Read More »मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दादासाहेब फाळके यांची जयंती उत्साहात साजरी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, विजू खोटे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची उपस्थिती
मुंबई : प्रतिनिधी आपल्या देशात चलचित्राची मुहूर्तमेढ रोवत चित्रपटसृष्टीचा पाया उभारणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती मराठी कलाकार-तंत्रज्ञांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. दादर येथील दादासाहेब फाळके चौकात जयंती साजरी करण्यासाठी जमा झालेल्या कलाकारांना पाहण्यासाठी रसिकांनीही खूप गर्दी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट …
Read More »“लुटता कशाला फुकटच न्या की” म्हणत दुध उत्पादक शेतकऱ्यांचा यल्गार सात दिवस आंदोलन करण्याचा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा इशारा
अहमदनगर : प्रतिनिधी लुटता कशाला फुकटच न्या असा संताप व्यक्त करत ग्रामसभेचा पहिला ठराव करणा-या औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावात सकाळी भजन कीर्तन करत दुध सरकारला फुकट देत ३ मे रोजी व अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनच्या पूर्वसंध्येला दगडाच्या सरकारवर दुग्धाभिषेक करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येत आहे. यावेळी डॉ.अजित नवले, धनंजय धोरडे, …
Read More »
Marathi e-Batmya