पार्थ पवार, डॉ.अमोल कोल्हे यांची उमेदवारी अखेर जाहीर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी १२ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज पुन्हा ५ उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी ही यादी जाहीर केली. यामध्ये दिंडोरी- धनराज महाले, नाशिक- समीर भुजबळ, शिरुर- डॉ अमोल कोल्हे, बीड – बजरंग सोनवणे, मावळ- पार्थ पवार या नावांची घोषणा केली.
लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. त्यामध्ये कॉंग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असेही त्यांनी सांगितले.
पवार साहेबांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *