Breaking News

भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी भिडे, एकबोटेंची नावे न घेता मुख्यमंत्र्यांचे उत्तर मात्र दलितांवरील बंदच्या काळातील खटले मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या ९३ अन्वये भीमा कोरेगांव येथील दंगलप्रकरणी प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेस उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या दंगलीस कारणीभूत असलेल्या आणि अँट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोन आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्याचे टाळत या दोन्ही आरोपींना …

Read More »

कोल्हापूरपेक्षाही लहान त्रिपुरा जिंकले म्हणून हुरळून जाऊ नका, महाराष्ट्राच्या मातीत या मग दाखवतो जयंत पाटील यांचे भाजपला आव्हान

मुंबई : प्रतिनिधी ईशान्य भारतातील निवडणूकीत त्रिपुरा राज्यात विजय मिळविल्याचा जल्लोष भाजपकडून साजरा करण्यात येत आहे. मात्र त्रिपुरा राज्य आहे तरी केवढे असा उपरोधिक सवाल करत आमच्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे मतदारसंघ मोठे आहेत. त्यामुळे अशा छोट्या मतदारसंघात विजय मिळविल्याने फार हुरळून जावू नका असा उपरोधिक टोला लगावत महाराष्ट्राच्या …

Read More »

भाजप सरकारच्या ३० हजार तासात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची सरकारवर टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सत्तेत येवून ३० हजार तास झाल्याचा उल्लेख केला. आमच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कधीच असे तास, सेंकद, मिनिटे मोजले नाहीत. मात्र अर्थमंत्र्यांनी मोजल्याने त्यांचे काही खरे दिसत नसल्याची उपरोधिक टीका करत तुमचे सरकार आल्यापासून राज्यातील १६ हजार …

Read More »

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडीमार्फत चौकशी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानसभेत आश्वाासन

मुंबई : प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (एसआरए) माजी मुख्याधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य …

Read More »

जेव्हा अध्यक्ष महाराज आमदारांची शाळा घेतात… भाजपच्या मुख्य प्रतोदांना अध्यक्ष बागडेंची ताकीद

मुंबई : बी.निलेश विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज भाजपचे आमदार आणि मुख्य प्रतोद राज पुरोहित यांना आपली जागा बदलण्यास मज्जाव घातला आणि काही मीनिटांसाठी आपण शाळेत आहोत की असा भास सर्वच आमदारांना झाला… घटना अशी घडली की… राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विरोध पक्षांनी मांडलेल्या मराठी शाळांबाबतच्या २९३ अन्वये …

Read More »

अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या चित्रकरणा दरम्यानची घटना

मुंबई : प्रतिनिधी बॅलिवुडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बॅालिवुडकरांसोबत जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. मागील काही दिवसांपासून अमिताभ राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. उन्हाचा तडाखा आणि बदलतं वातावरण यांच्या परिणामामुळे अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याचं सूत्रांकडून समजतं. अमिताभ …

Read More »

भाऊचं स्ट्रगलर्स कँटींग जगावेगळी अत्यंयात्रा चित्रपटात चालविणार कँटींग

मुंबई : प्रतिनिधी विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकांनाही न्याय देण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता भाऊ कदम सर्वांचाच आवडता बनला आहे. भाऊ सध्या विविधांगी विनोदी भूमिका साकारण्याला प्राधान्य देताना दिसतोय. ‘जगा वेगळी अंत्ययात्रा’ या चित्रपटातही प्रेक्षकांना एका भाऊ दिसणार आहे. या चित्रपटात भाऊने स्ट्रगलर्स कँटींगच सुरू केलं आहे. कितीही शिक्षण घेतलं तरी स्ट्रगल …

Read More »

शाळांचे समायोजन केले, बंद नाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कमी पटसंख्या असेल्या १३०० शाळा बंद नाही तर त्यांचे १ किलोमीटर अंतराच्या परिसरातील इतर शाळांमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या सहली, गँदरींग आदी गोष्टी होत असल्याने त्यांच्या अभ्यासाला गती मिळत असल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. तसेच या …

Read More »

दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याची अन्न व पुरवठा मंत्री बापट यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस दूध भेसळीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे ओरिसा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करावी अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी सूचनेच्या वेळी केली. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट  म्हणाले की, याबाबत …

Read More »

‘क्वॉर्टर’चा ट्रेलर व पोस्टर लाँच सोहळा संपन्न मानवी भावभावनांच चित्रण

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने क्रांती घडतेय असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. नव्या दमाचे, नव्या विचारांनी भारलेले, नावीन्याचा ध्यास घेतलेले आजच्या पिढीतील तरूण दिग्दर्शक नावीन्यपूर्ण प्रयोग करीत नव्या पिढीसाठी एक नवी वाट निर्माण करण्याचं कार्य मोठया निष्ठेने करीत आहेत. आजवर आपण केवळ सिनेमांचे ट्रेलर आणि पोस्टर …

Read More »