भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले सिद्धीविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईत सिद्धिविनायक मंदिर तसेच लालबागच्या राजासह अनेक गणेशोत्सव मंडळे आणि मंदिरांना भेट देऊन विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी नितीन नबीन यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, पणन मंत्री जयकुमार रावल, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, आ. संजय उपाध्याय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्यासह भाजपाची अनेक नेतेमंडळी उपस्थित होती.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी नितीन नबीन यांचे आगमन होताच आधीपासून जमलेल्या शेकडो भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत केले. सुहासिनींनी त्यांचे औक्षण केले. तेथून नितीन नबीन यांनी प्रभादेवी येथे जात सिद्धिविनायकाचे दर्शन घेत विधीवत पूजा केली. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. सिद्धिविनायक ट्रस्टचे खजिनदार पवन त्रिपाठी यांनी नितीन नबीन यांचे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

दुपारी मलबार हिलवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानीही श्री गणेशाचे दर्शन घेतले. नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. त्यानंतर नितीन नबीन यांनी वांद्रे रिक्लमेशन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *