धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्याचा केंद्राकडे प्रस्तावच नाही फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसविल्याचा खा.सुप्रिया सुळे यांचा आरोप

नवी दिल्ली : प्रतिनिधी

राज्यातील धनगर समाजाला शेड्यूल्ड ट्राईब अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्यासंदर्भातला प्रस्तावच राज्य सरकारने पाठविला नसल्याची माहिती जनजातीय मंत्रालयाने लोकसभेत दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाची फसवणूकच केली असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

धनगर आरक्षणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला असता जनजातीय कार्यमंत्रालयाने यावर उत्तर देताना धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रस्तावच पाठवलेला नसल्याचे उत्तर दिले.

सत्तेवर येताक्षणीच आरक्षण देवू असे आश्वासन देणाऱ्या भाजपने आपले आश्वासन पाळले नाही.निवडणूकीनंतर तातडीने हा प्रस्ताव त्यांनी केंद्राकडे पाठविला असता तर आत्तापर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान मिळाले असते. देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत प्रस्ताव न पाठवून खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे दाखवून दिले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

धनगर आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर नाही आणि या मुद्दयावर धनगर समाजाची फसवणूक होत असल्याची प्रचिती आज संसदेत आली. सत्तेवर येताक्षणीच आरक्षण देवू असे आश्वासन देणाऱ्या भाजपने आपले आश्वासन पाळलेले नसून धनगर समाजाची फसवणूक केल्याचे उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *