मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; “पॅरिस मधून हलली सूत्रे” ! उदय सामंतांची पुन्हा एकदा यशस्वी शिष्टाई

मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडण्याचा तसंच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे तसंच या विषयावरची चर्चा पुढे सरकावी यासाठी थेट “पॅरिसमधून सूत्रं हलली”! राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पॅरीसमधून जवळपास साडेतीन तासाच्या अथक शिष्टाई नंतर तोडगा काढण्यात यश मिळवलं.

उद्योगमंत्री उदय सामंत हे अंतराळ क्षेत्रातील गुंतवणूक व संशोधन विषयावरील एका परिषदेत सहभागी होण्यासाठी पॅरिस येथे गेले होते, दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई कडे कूच करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संकटमोचक म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिलं जात होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोपवलेल्या जबाबदारी नुसार उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद जारी ठेवला.

चर्चेचा घटनाक्रम .. काय घडलं पडद्या मागे ..!

काल दिवसभरात उदय सामंत किमान ७ वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील ७ वेळा उदय सामंत ह्यांनी चर्चा केली, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड व उदय सामंत ह्यांच्यामध्ये कॉन्फरन्स कॉल वर चर्चा झाली. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांशी उदय सामंत यांची चर्चा झाली. त्यानुसार गणेशोत्सव पाहता जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावे व त्यांच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन देण्यात आलं..त्यानंतर शिष्टमंडळ बीड साठी निघाले…..आंदोलन जरी महाराष्ट्रात स्थगित झाल असेल तरी तरी “केंद्र बिंदू होता पॅरिस !”

About Editor

Check Also

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले कृषी विभागाकडून अधिसूचना जारी

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *