सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती …
Read More »शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास मंजूरी दोनशे कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणि १ हजार रोजगार निर्मितीची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र ‘ऑरिक’मध्ये विविध कंपन्यांना औद्योगिक भूखंडांचे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (एम आय टी एल) आणि एनआयसीडीसी या संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या भूखंड वाटप समितीने प्राधान्य व विस्तार या श्रेणींतील अर्जांचा विचार केला. प्रस्तावांची छाननी प्रकल्पाची व्यवहार्यता, उलाढाल, जमिनीची आवश्यकता …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेल्या राख्यांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम
राज्यभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून मुख्यमंत्री म्हणून मला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या आहेत. यामध्ये बहिणींचे निस्सीम प्रेम आणि आशीर्वाद आहेत. महिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असून महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर राहिल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त …
Read More »परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन, अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा
विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने अधिकारांबरोबरच जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे. पदोन्नत अधिकाऱ्यांनी राज्यात रस्ता सुरक्षा वाढवून अपघाती मृत्यू रोखण्यावर भर देण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या शाळा खाजगी लोकांच्या घशात घालण्याचा घाट मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक, मंत्री लोढा व सरकारला बांगड्यांचा आहेर
शिक्षण व आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून १०० कोटी रुपये खर्च केले आहेत.भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. …
Read More »डॉ एस जयशंकर यांची टीका, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा धोरण राबविणारा दुसरा कोणी नाही भारतावर टॅरिफ आकारणीवरून आणि परराष्ट्र धोरणावरून केली टीका
सध्याच्या राष्ट्राध्यक्षांएवढे सार्वजनिकरित्या परराष्ट्र धोरण राबविणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कधीच नव्हता अशी टीका परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वर्णन केले. दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले, हे स्वतःच एक पाऊल आहे जे केवळ भारतापुरते मर्यादित नाही… राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जगाशी वागण्याचा मार्ग, अगदी त्यांच्या …
Read More »इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी म्हणाले, …पण लोकशाहीच आव्हानाखाली एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार
सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केल्यानंतर विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) देशात “लोकशाहीमध्ये कमतरता” असल्याचे सांगत संविधान “तणावाखाली” असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याचे वचन दिले. एका वृतत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती बी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा मोदी वर हल्लाबोल, गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिक्सं झालं काय? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून …
Read More »बेरोजगार प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह २५ ऑगस्टला रोजगार यात्रा आणि तिरंगा यात्रा
राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा …
Read More »भारत ब्राझिलसोबत इंधनासाठी करणार करार अमेरिकेमुळे रशियाशी तेल व्यापार कमी केल्यानंतर ब्राझिलशी करार करणार
एस अँड पी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सनुसार, शुल्क अनिश्चितता आणि अमेरिकेसोबत वाढत्या व्यापार चिंतांदरम्यान, भारत ब्राझीलसोबत तेल व्यापार वाढवण्याच्या संधी शोधत असल्याचे दिसून येत आहे. रशियाकडून देशात तेलाचा प्रवाह सुरू असताना, भारतीय रिफायनर्स त्यांच्या सोर्सिंगमध्ये विविधता आणत आहेत – यामुळे ब्राझिलियन कच्च्या तेलाचा प्रवाह भारतात येऊ शकतो. भारत आणि ब्राझील दोघांनाही …
Read More »
Marathi e-Batmya