Breaking News

अनिल अगरवाल यांची वेदांत हिंदुस्तान झिंकचे ७५०० कोटींचे शेअर्स विकणार एका ब्लॉक डिलच्या माध्यमातून विकणार

हिंदुस्तान झिंक लिमिटेडची प्रवर्तक वेदांत लिमिटेड ब्लॉक डीलद्वारे ₹७,५०० कोटी पर्यंतचे शेअर्स विकणार आहे. अपेक्षित विक्री गेल्या बंद किमतीपेक्षा १०% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सीएनबीसी आवाजने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. डीएएम कॅपिटल आणि सिटी हे व्यवहार सुलभ करणारे ब्रोकर आहेत, जे लवकरच बाजारात येण्याची अपेक्षा आहे. हे धोरणात्मक …

Read More »

रिलायन्सचे अनंत आणि आकाश अंबानीही आता श्रीमंताच्या यादीत एकत्रित संपत्ती ३.५९ लाख कोटींची

रिलायन्स इंडस्ट्रीजचे वंशज अनंत अंबानी आणि आकाश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले आहेत, त्यांची एकत्रित संपत्ती ३.५९ लाख कोटी रुपये आहे, असे ३६० वन वेल्थ क्रिएटर्स लिस्ट २०२५ नुसार दिसून आले आहे. या अहवालात भारतीय संपत्ती निर्मात्यांच्या एका नवीन पिढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामध्ये ४० …

Read More »

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीसाठी पुन्हा सवलत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्क माफ

धारावी पुनर्विकासाची निविदा जाहिर केल्यापासून अनेक विशेष अटी आणि नियमात दुरुस्ती करत अनेक सवलती राज्य सरकारकडून अदानी कंपनीसाठी जाहिर केल्या. इतकेच नव्हे तर अदानीने धारावीच्या पुनर्विकासासाठी एखाद्या मागणी प्रशासनासमोर ठेवल्यास त्यास सात दिवसाच्या आत किंवा विहित कालावधीत संबधित प्रशासनाने मान्यता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मिठागरांच्या जमिनी, मदर डेअरीची …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णयांना मंजूरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे असे ९ ते १० निर्णय घेण्यात आले. यात आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मिळाणाऱ्या मानधनात दुपट्टीने वाढ केली आहे. तर आदिवासी इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमिन, मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्कात सवलत, मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क माफ, मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी …

Read More »

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्याने मुदतवाढ

केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठी, तसेच शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषिविषयक …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर शेतकऱ्यांसाठी नव्या महाॲग्री-एआय धोरणास मंजूरी

राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपात प्रवेश का? शिवसेना उबाठाचे सुधाकर बडगुजर यांच्या भाजपाच्या प्रवेशावर केली टीका

भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार

श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रॉ प्रताप सरनाईक …

Read More »

आपत्कालीन कार्य केंद्राचा इशारा, या घाट परिसराला २४ तासाचा ऑरेंज अलर्ट रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांचा इशारा

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ …

Read More »

कमल हासनच्या ठग लाईफ चित्रपटावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, गर्दीनुसार निर्णय… ठग लाईफ कर्नाटकात प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की कमल हासन अभिनीत ‘ठग लाईफ’ हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होऊ दिला पाहिजे आणि जमाव आणि दहशतवाद्यांना रस्त्यावर उतरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. ‘कन्नडचा जन्म तमिळ भाषेतून झाला आहे’ या कमल हासन यांच्या टिप्पणीमुळे अलिकडेच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात …

Read More »