विधिमंडळाच्या कामकाजात तसे पाह्यला गेले तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि कधी खडाजंगीमुळे वातावरण तप्त होते. तर कधी अनेकां आमदार, मंत्री किंवा दोन पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विधिमंडळातील वातावरण क्षुब्ध पाहिल्याचे आपण अनेकांनी पाहिले असेल. मात्र रोजच्या कामकाजाच्या मानसिक गोंधळामुळे सत्ताधारी पक्षातील एक मंत्री दुसऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला मंत्री म्हणून संबोधल्याने काही काळ मिश्किल वातावरण झाल्याच्याही घटनाही विधिमंडळात झाल्याचे आज पाह्यला मिळाले. पण मिश्किल स्वभावाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बाबतच जर अशी घटना पाह्यला मिळाल्याने सभागृहातील वातावरणच काही काळासाठी मिश्किल झाल्याचे पाह्यला मिळाले.
झाले असे की, अक्कलकुवाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी चक्क आमश्या पाडवी यांनाच मंत्री महोदयानी असे दोन वेळा म्हणत दिलेली माहिती बरोबर असल्याचे सांगितले.
आज सकाळी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान अक्कलकुवाचे आमदार आमश्या पाडवी यांनी तेले भेसळीवरून प्रश्न उपस्थित करत या तेलभेसळीमुळे स्थानिक भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगत हा मतदारसंघ पूर्ण आदिवासी नागरिकांचा आहे. येथील नागरिकांना भेसळयुक्त तेल विकण्यात येत असल्याने येथील नागरिकांना कर्करोग सारख्या आणि इतर गंभीर आजार होत आहेत. याबाबत मी तक्रार केली असता २५ लाखाचा माल जप्त करण्यात आला पण काही दिवसातच त्या व्यक्तीचा माल परत करत तो माल चांगला असल्याचे उत्तर विभागाने दिले. मात्र आता त्या व्यक्तीच्या तेलभेसळीमुळे आमचे आदिवासी बांधव आजारी पडत आहेत. त्यामुळे त्या संबधित व्यक्तीवर कारवाई होईल का? असा सवाल उपस्थित केला.
आमदार आमश्या पाडवी यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आमश्या पाडवी यांच्या उल्लेख दोन वेळा मंत्री महोदय असा केला. विशेष म्हणजे पहिल्यांदा इतर आमदारांनी अशी चूक लक्षात आणून दिल्यानंतरही पुन्हा नरहरी झिरवाळ यांनी दुसऱ्यांदा तीच चूक केली. त्यावर सभागृहात हस्याची एकच लकेर उमटली. त्यानंतर नरहरी झिरवाळ यांना चुक आठवल्यानंतर त्याबद्दल मी सॉरी म्हणतो ना असे सांगत पुढे उत्तर द्यायला सुरुवात केली.
दरम्यान या गोंधळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मिश्किलपणे म्हणाले की, अहो त्यांना भूमिकेत यायला वेळ द्याल की नाही अशी टीपण्णी केली. त्यावर चूक झाल्याचे झिरवाळ यांच्या लक्षात आणून देणाऱ्या आमदारांनी एकच हसून दाद दिली.
Marathi e-Batmya