Breaking News

दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग कंपनीची नागपूरमध्ये १ हजार ७४० कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाशी सामंजस्य करार

महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान १ हजार ७४० कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली. कंपनीने …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अवमान करा आणि पुरस्कार व संरक्षण घ्या! राज्य सरकारचे धोरण महिलांवरील बलात्कार सरकारचे अपयश, गृह विभागाचा कारभार घाशीराम कोतवालाच्या हातात असल्याचे द्योतक

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान  करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब …

Read More »

चंद्रकांत पाटील याची माहिती, नवीन कार्यपद्धतीसह अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता अध्यापक निवड प्रक्रिया पारदर्शक,निःपक्ष राबविण्यासाठी गुणवत्ताधारित नवीन कार्यपद्धती जाहीर

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक पदांची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची माहिती, ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी राज्य सीईटी सेलच्या ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात  येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  परीक्षांचा  सराव करता  यावा यासाठी   ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात आतापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करा सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा

राज्यातील सर्वच बसस्थानक व  आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (security audit) करण्यात यावे.तसेच बसस्थानक व आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या  निर्लेखन बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला सुरक्षा रक्षक नेमणार महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्य केंद्रांच्या कामाला गती द्या पर्यटक आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा व कार्ल्यात पर्यटक पोलिस ठाणे

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण,  कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात. मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासह श्रीएकवीरा …

Read More »

शिवसेना उबाठाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा घेत पक्षप्रवेश संपन्न

उबाठा गटाचे हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि मनसेचे हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. सुजित मिणचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक …

Read More »

वक्फ बोर्ड निधीः शिंदे यांच्या काळात वाद, तर फडणवीसांच्या काळात निधी देऊनही शांतता आता कोण आंदोलन करणार, भाजपाशी संबधित कोणी बोलेचना

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडून आणि विविध राज्यातील राज्यांच्या सरकारकडूनही मुस्लिम धर्मियांना उद्देशून सातत्याने टार्गेट करणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यातच महाराष्ट्रातही नव्याने सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून आणि त्यापूर्वीही भाजपाचे आमदार आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे ही  सातत्याने मुस्लिम धर्मिय लोकांना उद्देशून चितावणीखोर वक्तव्य करत असतात. मात्र …

Read More »

गतवर्षीच्या तुलनेत ४.३ टक्के जास्त धान खरेदी सराकरकडून आतापर्यंत ६७.९१ दशलक्ष टन धान्य विकत घेतले

२०२४-२५ हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) खरेदी मोहिमेच्या जवळपास पाच महिन्यांत, प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये सरकारची धान खरेदी आतापर्यंत ६७.९१ दशलक्ष टन (एमटी) ओलांडली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत ४.३% जास्त आहे. पुढील काही महिन्यांत, सरकार चालू हंगामात ७३ मेट्रिक टन किंवा ४९.५६ मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्याची शक्यता आहे ज्यामुळे धान्याचा साठा वाढेल. …

Read More »

शाहरूख खान सोडणार मन्नत बंगला, पाली हिलला जाणार मन्नतचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याने तात्पुरता सोडणार बंगला

शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब मुंबईतील त्यांचा प्रतिष्ठित बंगला, मन्नत, तात्पुरते रिकामा करून पाली हिल येथे स्थलांतरित होत असल्याचे वृत्त आहे. वांद्रे बँडस्टँडसमोरील हा बंगला एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे, जिथे दररोज शेकडो चाहते येतात. खान कुटुंब गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून तेथे राहत आहे. हिंदुस्तान टाईम्समधील वृत्तानुसार, मन्नतचे भव्य …

Read More »