महाराष्ट्राच्या विकास प्रवासात विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या (जायका) या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता वैद्यकीय क्षेत्रातही सहकार्याची नवी दिशा निर्माण होणार आहे. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यास उत्सुक असून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालावे; ‘शक्ती’ कायदा लागू करा मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे पत्र पाठवून मागणी
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना भिती बसली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे. नसरापूरच्या घटनेनंतर आतातरी राज्य सरकारने गंभीर होऊन महिला सुरक्षेवर काम करावे, यासाठी राज्यपाल यांनी जातीने लक्ष घालावे व ‘शक्ती’ कायदा लवकरात लवकर राज्यात लागू करावा यासाठी …
Read More »नितेश राणे यांची माहिती, पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ उभारणार मंत्रालयातील बैठकीनंतर दिली माहिती
पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर निवेदन सादर केले. ‘स्कायला …
Read More »डिजिटल युगात डेटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य टेक वारी 2.0 प्रशिक्षणांतर्गत डीपीडीपी कायद्याबाबत मंत्रालयात सखोल मार्गदर्शन
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डेटाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. चुकीच्या हातात गेलेला डेटा व्यक्ती, समाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक, तसेच डेटा लीकच्या घटनांमुळे याची गंभीरता अधिक असल्याने डिजिटल युगात डेटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे …
Read More »तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस होते. तुळजापूर येथील तुळजापूर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी संस्थांनामार्फत चालविले जाणारे श्री तुळजाभवानी …
Read More »सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु होणार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेता येणार
सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), …
Read More »आदिवासींच्या ५ प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिकमध्ये, १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक – कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने …
Read More »पत्नीच्या जाचाला कंटाळून न्यायाधीश अमन शर्मा यांनी केली आत्महत्या वडिलांचा अपमान केल्याने न्यायाधीश झाले होते अस्वस्थ
“आता जगणे अशक्य आहे,” असे दिल्लीस्थित न्यायाधीश अमन शर्मा यांनी आपल्या वडिलांना शेवटच्या फोन कॉलवर सांगितले होते. पत्नीने वडिलांचा केलेला अपमान सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी हे सांगितले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. दिल्लीत कार्यरत असलेले न्यायाधीश आणि अलवरचे रहिवासी असलेले अमन शर्मा यांनी २ मे रोजी आत्महत्या …
Read More »इराणची स्पष्टोक्ती, आता चेंडू अमेरिकेच्या ताब्यात, पण इराण दोन्ही गोष्टींसाठी तयार शांती आणि युद्ध या दोन्ही गोष्टींसाठी तयार
अमेरिकेने तेहरानच्या ताज्या शांतता प्रस्तावावर साशंकता दर्शवल्यानंतर, पुढील पाऊल वॉशिंग्टनच्या हातात आहे, असे इराणने म्हटले आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी तेहरानमधील राजनैतिक अधिकाऱ्यांना सांगितले की, “मुत्सद्देगिरीचा मार्ग निवडायचा की संघर्षात्मक दृष्टिकोन सुरू ठेवायचा, हे आता अमेरिकेच्या हातात आहे,” आणि इराण “दोन्ही मार्गांसाठी तयार आहे.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड …
Read More »अनिल देशमुख यांचा सवाल, राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? २४ तासात दोन घटना घडल्या
पुणे जिल्ह्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय नराधमाने केलेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणे हे राज्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.या घटनांवरून राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही,असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते …
Read More »
Marathi e-Batmya