बीएसएनएलने आणला अवघ्या ४९९ रुपयांमध्ये फोन

नवी दिल्लीः प्रतिनिधी

सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएलने अवघ्या ४९९ रुपयांमध्ये एक नवीन फिचर फोन आणला आहे. बीएसएनएलने मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी डिटेलच्या सहकार्याने हा फोन तयार केला आहे. या फोनवर १ वर्ष व्हॉईस कॉलची ऑफर मिळणार आहे. फोनची घोषणा जयपूरमध्ये करण्यात आली.

फोनची मूळ किंमत ३४६ रुपये असून बीएसएनएलने दिलेल्या बंपर ऑफर मुळे फोनची किमत ४९९ रुपये झाली आहे.ऑफरची किंमत आहे १५३ रुपये आहे.  या ऑफरमध्ये वर्षभर बीएसएनएल टू बीएसएनएल १५ पैसे प्रति मिनिट दर आकारला जाईल तर बीएसएनएल टू अन्य नेटवर्कवर ४० पैसे प्रति मिनिट दर असेल.

या फोनला १.४४ इंच असलेला मोनोक्रोम डिस्प्ले आहे. हा GSM 2G नेटवर्कवर काम करतो. यामध्ये केवळ एकच सिम वापरता येणार असून ६५० mAh क्षमता असलेली बॅटरी फोनमध्ये आहे.

About Editor

Check Also

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्पष्टोक्ती, व्याज दर कमीच राहणार व्याज दर आणखी कमी होण्याची शक्यता

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी २०२६) सांगितले की, प्रमुख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *