पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची घोषणा, घरगुती गॅसच्या किंमतीत ५० रूपयांची वाढ एका सिलेंडर मागे ५० रुपयांची वाढ

एकाबाजूला अमेरिकेने जाहिर केलेल्या टॅरिफ धोरणाच्या विरोधात जगभरातील देशांकडून अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर मंदी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच काल अमेरिकेतील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच अमेरिकेने चीनवर लादलेल्या रिसिप्रोकल कराला प्रत्युत्तर म्हणून ३५ टक्के कर जाहिर केला. या दोन्ही घटनांना ३६ तासही उलटत नाही तोच भारत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत थेट ५० रूपयांची वाढ जाहिर केली.

यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सोमवारी घोषणा केली की, अनुदानित आणि विनाअनुदानित ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू आहे. तसेच सुधारित किमती ८ एप्रिलपासून लागू होतील.

पुढे बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हि वाढ “पीएमयूवाय लाभार्थ्यांसाठी, किंमत ५०० रुपयांवरून ५५० रुपयांपर्यंत वाढेल. इतर ग्राहकांसाठी, ती ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत वाढेल,” असेही यावेळी सांगितले.

हरदिप सिंग पुरी यांनी पुढे सांगितले की, या सुधारणांचा साधारणपणे २-३ आठवड्याने नियमित आढावा घेतला जाईल.

हरदीपसिंग पुरी यांनी असेही स्पष्ट केले की, पेट्रोल आणि डिझेलवरील अलिकडच्या उत्पादन शुल्क वाढीचा उद्देश ग्राहकांवर भार टाकणे नाही. त्याऐवजी, अनुदानित गॅसच्या किमतींमुळे तेल विपणन कंपन्यांना झालेल्या ४३,००० कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यास मदत करणे हा असल्याचे सांगत तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ४१ रुपयांनी कमी केल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला आहे.

या सुधारणांनंतर, दिल्लीत व्यावसायिक एलपीजीची सुधारित किरकोळ किंमत १,७६२ रुपये आहे. हे एक दिलासा देणारे आहे, कारण ओएमसींनी १ मार्च रोजी प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ६ रुपयांनी वाढवल्या होत्या.

About Editor

Check Also

विप्रोच्या एआयमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली नोकर भरती आणि सॉफ्टवेअर विकास आणि कराराचे स्वरूप बदलतोय

विप्रोच्या एआय (AI) उपक्रमांमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली आहे, ज्यांना नंतर भारतीय आयटी फर्ममध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *