अर्थविषयक

भारतीयांची अॅमेझॉन, टाटा मोटर्स, इन्फोसिस कंपन्यामधील नोकऱ्यांना जास्त पसंती रँडस्टॅडने सर्व्हेक्षण अहवालातून माहिती आली पुढे

नोकरीसाठी कंपनी निवडताना भारतीय कर्मचाऱ्यांसाठी वर्क-लाइफ बॅलन्स, इक्विटी, आकर्षक पगार आणि योग्य नुकसान भरपाई आणि फायदे पॅकेज हे ३ महत्त्वाचे कर्मचारी मूल्य असल्याची माहिती रँडस्टॅडने केलेल्या सर्व्हेक्षण अहवालातून पुढे आली आहे. एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च (आरईबीआर) २०२४ या शीर्षक अहवालानुसार जगभरातील १.७३ लाख उत्तरदात्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये ३२ बाजारपेठा आणि जागतिक …

Read More »

ओलाने नव्या गाड्यांसह ग्राहकांसाठी या नव्या योजनाही केल्या जाहिर ONDC, ओला पे, इलेक्ट्रॉनिक लॉजिस्टीकही केले सुरु

इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करत नवीन Gen-3 प्लॅटफॉर्म आणि MoveOS 5 सोबत स्वदेशी विकसित सेल आणि बॅटरी पॅकचे ओला कंपनीचे प्रमुख भावीश अग्रवाल यांनी अनावरण केले. संकल्प २०२४ या कार्यक्रमादरम्यान, ओला कंझ्युमरने ONDC एकत्रीकरण, १००% इलेक्ट्रिक लॉजिस्टिक्स, एआय AI-चालित शोध, सुलभ क्रेडिट, स्वयंचलित वेअरहाउसिंग, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान प्रणाली आणि लॉयल्टी प्रोग्राम …

Read More »

डिजीटल बातम्यांच्या सबस्क्रिप्शनवरही द्यावा लागणार १८ टक्के जीएसटी कर अर्थमंत्रालयाचा प्रस्ताव

आधीच खाण्याच्या वस्तूसह प्रत्येक गोष्टींवर, सेवांवर आणि इतकेच नव्हे तर सगळ्या वस्तूंवरही जीएसटी कराची आकारणी केलेली आहे. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता आणखी एका गोष्टीसाठी जीएसटी कराच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. डिजिटल न्यूज सबस्क्रिप्शनवर लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (GST) कर १८ टक्के लागू करण्याचा …

Read More »

हिंडेनबर्ग अहवालावर मॉरिशसचा खुलासा, ते फंड आमचे नाहीत अदानी आणि माधबी पुरी बुच यांच्यावरील संशय आणखी गडद

मॉरिशसचे वित्तीय बाजार नियामक, वित्तीय सेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की सेबीचे प्रमुख आणि अदानी समूह यांना लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या वादाच्या केंद्रस्थानी असलेला ऑफशोर फंड मॉरिशसमधील नाही. हिंडेनबर्गच्या अहवालात ‘आयपीई प्लस फंड’ हा एक छोटा ऑफशोर मॉरिशस फंड आहे’ आणि ‘आयपीई प्लस फंड १, मॉरिशसमध्ये नोंदणीकृत फंड’ असे म्हटले …

Read More »

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.५ टक्क्याने वाहन विक्रीत घट गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कार विक्री कमी

देशांतर्गत बाजारपेठेतील एकूण प्रवासी वाहन (पीव्ही) घाऊक विक्री (डीलर्सना पाठवणे) जुलैमध्ये २.५ टक्क्यांनी वार्षिक (YoY) घटून ३,४१.५१० युनिट्सवर आली, जी मागील महिन्यात ३,५०,३५५ युनिट्सच्या तुलनेत होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ने बुधवारी सांगितले. तथापि, देशांतर्गत बाजारपेठेतील एकूण दुचाकी विक्री या महिन्यात १२.५ टक्क्यांनी वाढून १४,४१,६९४ युनिट्सवर पोहोचली, जी …

Read More »

आयपीओसाठी एनएसईने सेबीकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले नाही दिल्ली उच्च न्यायालयात सेबीची माहिती

भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले आहे की नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने त्याच्या सूचीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र एनओएसी NOC साठी कोणतीही नवीन याचिका सादर केलेली नाही. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर आयपीओ IPO ची गती वाढवण्याची मागणी करणाऱ्या …

Read More »

निप्पॉन म्युच्युअल फंड इंडिया स्मॉल कॅप फंडाच्या सदस्यत्व मर्यादेत सुधारणा प्रति दिन आणि प्रति पॅन ५० हजाराची मर्यादा

निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडासाठी त्याच्या सदस्यत्व मर्यादा सुधारित केल्या आहेत, शुक्रवारपासून, म्हणजेच १६ ऑगस्ट २०२४ पासून प्रभावी. नवीन बदलांमध्ये, नवीन सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) आणि सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन्स (STPs) साठी दैनंदिन गुंतवणुकीची मर्यादा प्रति दिन ५०,००० रुपये प्रति पॅन वरून ५०,००० रुपये प्रति व्यवहार किंवा हप्त्याच्या …

Read More »

अदानी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल हिंडेनबर्गने केलेल्या सेबी प्रमुखाबाबत आरोप केल्याने संशयाचे वातावरण

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्याविरुद्ध नवीन हिंडेनबर्ग संशोधन आरोपांमुळे “संशयाचे वातावरण” निर्माण झाले आहे, ज्यामुळे न्यायालयाला अदानी समूहाविरुद्धचा तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याचे निष्कर्ष घोषित करा अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते-व्यक्तिगत, अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल …

Read More »

सौरव दत्ता यांच्या त्या २५ लाख उत्पन्नावर नेटकऱ्याकडून प्रतिक्रियांचा पाऊस महिन्याकाठी १.५० लाख रूपयांची कमाई

वादग्रस्त वक्तव्यावरून ओळखले जाणारे, गुंतवणूकदार सौरव दत्ता यांनी त्यांच्या एक्स X वर नवीन पोस्ट करत एक वेगळेच मत व्यक्त केल्याने, त्यांच्या ट्विटवरून नेटकऱ्यांमध्ये वाद विवादाला सुरुवात झाली आहे. सौरव दत्ता यांनी एका पोस्टमध्ये, दावा केला आहे की वार्षिक ₹ २५ लाख पगार तीन लोकांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पुरेसा नाही असे …

Read More »

डिएसपी म्युच्युअल फंडने जारी केला पहिला निफ्टी एनएफओ इंडेक्स भारतात पहिला निफ्टी १० इक्वल वेट

डिएसपी DSP म्युच्युअल फंडाने भारतातील पहिला निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स फंड आणि ईटीएफ लॉन्च केला आहे, जो फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनद्वारे निफ्टीमधील टॉप १० भारतीय कंपन्यांमध्ये समान गुंतवणूक करेल. डीएसपी निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी टॉप १० इक्वल वेट ईटीएफचे उद्दिष्ट निफ्टी 50 …

Read More »