अर्थविषयक

भारताचा डॉलरचा साठा पुन्हा घटला इतका राहिला परकीय चलन साठा

परकीय चलनाच्या आघाडीवर भारताची स्थिती चांगली नाही. सलग तिसऱ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. सध्या विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत आहेत. शेअर बाजारही यामुळे कोसळला आहे. त्यामुळे देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात २२ सप्टेंबरला संपणाऱ्या आठवड्यात …

Read More »

या ५ कंपन्यांचे शेअर्स पुढील आठवड्यात लिस्ट होणार जाणून घ्या ग्रे मार्केटमध्ये किती किंमत

पुढील आठवड्यात शेअर बाजारात किमान ५ कंपन्यांचे शेअर्स लिस्ट होणार आहेत. विशेष बाब म्हणजे ग्रे मार्केट या पाच आयपीओचे लिस्टींग सकारात्मक म्हणजेच नफ्यासह होण्याचे संकेत देत आहे. या आयपीओंबद्दल जाणून घेऊया. 1. मनोज वैभव जेम्स आयपीओ या कंपनीचे शेअर्स ३ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध होतील. बाजार तज्ञांच्या मते, शुक्रवार, …

Read More »

५५ हजार कोटी रुपये जमा करा; Dream 11 सह ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्राची नोटीस जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Dream 11

‘ड्रीम ११’ ( Dream 11 ) सह इतर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्र सरकारने झटका दिला आहे. या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना तब्बल ५५ हजार कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपन्यांवर वस्तू आणि सेवा …

Read More »

रिलायन्स कंपनीला दिलेल्या पाच विमानतळांचा ताबा राज्य सरकार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एमआयडीसीला आदेश

राज्यात २००९ साली शासकिय जमिनीवरील विमानतळांचा विकास आणि तेथील प्रवाशी व्यवस्था सुरु करण्यासाठी एमआयडीसीच्या मालकीची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला पाच विमानतळे चालविण्यासाठी देण्यात आली होती. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचा समावेश होता. ही पाचही विमानतळे रिलायन्स कंपनीला भाडेपट्ट्याने दिल्यानंतरही मात्र, गेल्या १४ वर्षांत …

Read More »

रिझर्व्ह बँकेने ( RBI ) स्टेट बँकेसह तीन बँकांना ३.९२ कोटी रुपयांचा ठोठावला दंड RBI ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे.

मुंबई/नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांना 3.92 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मार्गदर्शक तत्वांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात …

Read More »

आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडीची मुदत वाढवली ३१ ऑक्टोंबर पर्यंत मुदतीचा कालावधी वाढविला

आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडीमधील गुंतवणुकीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. बँकेच्या या योजनेत गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळेल. आयडीबीआय बँक ४४४ दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी योजनेत ७.१५ टक्के व्याज दर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के दराने व्याज मिळत आहे. या एफडीतून मुदतीपूर्वी गुंतवणूककाढण्याची आणि बंद करण्याची परवानगी आहे. आयडीबीआय …

Read More »

बॉण्ड म्युच्युअल फंडातून गुंतवणूकदारांची मोठी विक्री ऑगस्टमध्ये २५,८७२ कोटी रुपये काढले

गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये बाँड म्युच्युअल फंड (डेट म्युच्युअल फंड) योजनांमधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांनी २५,८७२ कोटी रुपये काढले आहेत. गुंतवणूकदारांची सावध वृत्ती आणि अमेरिकेतील सध्याचे व्याजदर डेट म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढण्यात आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये १६ …

Read More »

पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना ५ लाख जमा केल्यानंतर मिळणार इतकी रक्कम

एक सुपरहिट सरकारी योजना आहे. यामध्ये पैसे एकत्र गुंतवून तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळेल. पोस्ट ऑफिस मासिक योजना असे या सरकारी योजनेचे नाव आहे. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये ५ वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक हमी उत्पन्न योजना आहे. एकल खातेदार यामध्ये जास्तीत जास्त ९ …

Read More »

आकासा एअर बंद होण्याचा धोका, जाणून घ्या काय आहे प्रकरण जाणून घ्या काय प्रकरण ४३ वैमानिकांनी दिले राजीनामे

देशात विमान वाहतूक क्षेत्रातील संकट अधिक गडद झाले आहे. नुकतीच सुरू झालेली आकासा एअर ही विमानसेवाही बंद होण्याचा धोका आहे. दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या या कंपनीच्या ४३ पायलटांनी अचानक राजीनामा दिला आहे. यामुळे कंपनीला दररोज २४ उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, वैमानिकांच्या …

Read More »

EPFO ने जुलैमध्ये विक्रमी सदस्य जोडले, १८.७५ लाख नवीन सदस्य ५२ ट्रांसजेंडर कर्मचाऱ्यांचीही नोंदणी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, ईपीएफमध्ये जुलैमध्ये सर्वाधिक १८.७५ लाख सदस्य जोडले गेले आहेत. एप्रिल २०१८ मध्ये ईपीएफओ (EPFO) पेरोल डेटाचे प्रकाशन सुरू झाल्यापासून सर्वाधिक सदस्य जोडण्याचा हा विक्रम आहे. ही आकडेवारी सप्टेंबर २०१७ पासून प्रकाशित केला जात आहे. हा ट्रेंड सलग तीन महिने सुरू आहे. जून २०२३ …

Read More »