रिलायन्सला ९ हजार ४२३ कोटींचा नफा नफ्यात २५ टक्क्याने वाढ

मुंबई : प्रतिनिधी
आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला ९ हजार ४२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर मागील वर्षीच्या या तिमाहीत रिलायन्सला ७ हजार ५३३ कोटींचा नफा झाला होता.
तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचे उत्पन्न ३०.५ टक्के वाढून १ लाख ९ हजार ९०५ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ८४ हजार १८९ कोटी रुपये होते. तर तिमाही आधारावर कंपनीचे उत्पन्न ८.६ टक्के वाढले आहे.
जिओला ५०४ कोटींचा नफा 
 या तिमाहीत दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनेही चांगली कामगिरी नोंदवली आहे. ऑक्टोंबर – डिसेंबर तिमाहीत जिओला  ५०४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत जिओला २७१ कोटींचा तोटा झाला होता. सध्या जिओचे १६ कोटी ग्राहक आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, प्रशासन एमएसीसीआयएच्या संकल्पनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे ३६ जिल्ह्यांत ३६ हजार ग्रामीण उद्योजक १.४४ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) ने राज्याच्या ग्रामीण आर्थिक लँडस्केपमध्ये बदल घडवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *