सोलापूरात ११४ वर संख्या पोहोचली ३२ पैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह

सोलापूर: प्रतिनिधी
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज ३२ जणाचे पाठविण्यात आलेले अहवालापैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी ३ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून आता रूग्णांची संख्या ११४ वर पोहोचली आहे.
नव्याने बाधीत असलेले रूग्ण आकाशवाणी रोडवरील गवळी वस्ती येथील एक जण असून पोलिस मुख्यालय अशोक चौकातील २ जण रूग्ण आहेत.
सद्यपरिस्थितीत होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या ४ हजार ६३७ आहे. तर संस्थात्मक विलगीकरण कक्षात २२५६ जण आहेत. आतापर्यत जवळपास १९७३ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी १६७४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १५६० जणांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. २९९ जणांचे अहवाल प्रलंबित असून ११४ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आढळून आल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष द्या 'एनसीआय'मध्ये 'ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स' परिषदेचे उद्घाटन

गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *