कोविड काळातील सेवेसाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अशीही “भेट” सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोविड काळात मृत्यूशी सामना करत रूग्णांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचे मौल्यवान योगदान दिले. या योगदानाबद्दल राज्य सरकारकडून सर्व शासकिय आणि पालिका रूग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना राज्य सरकारने एक अनोखी भेट दिली. या कामाचा ऋणनिर्देश म्हणून १ लाख २१ हजार रूपये भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंदर्भात शासन निर्णयही आज जारी करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यारमाने दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला.

या निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येतील.

तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा देणार लाभ

महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *