नागरिकांनो सावधान ! चीनी हॅकर्स सक्रिय सायबर विभागाचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी
सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डर वरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे बालासिंग राजपूत यांनी केले.
चीनच्या हॅकर्सनी २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्लयामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा/ आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला इमेल पाठवला जाईल. जसे की Free Covid Test, Free Covid-19Kit. त्या इमेल मध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अश्या प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि वरील दाखविल्या प्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेल ला प्रतिसाद देऊ नका आणि covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका. सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईल साठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत [Paid/Licensed] अँन्टी व्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईल मधील अँप नियमित पणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. आणि ते नियमितपणे बदलत राहा, तुमच्या महत्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या. प्रलोभने देणारे संशयास्पद इमेल उघडू नये. त्यातील लिंक वर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये. खोट्या आणि प्रलोभने देणा-या इमेल आणि वेबसाईट पासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्वाची माहिती जसे कि युजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *