लहान मुलांसाठी ‘खिलखिलाहट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाहट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

घाटकोपर येथील एन वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात अर्जदार पूनम नायर यांनी लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मिळत नसल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत, अशी तक्रार केली होती त्यावर उत्तर देताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक ,आमदार पराग शहा, ‘एन वॉर्ड’ चे सहायक आयुक्त संजय सोनवणे,अपर जिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपायुक्त देविदास क्षीरसागर, यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले, गुजरात शासनाने लहान मुलांसाठी ‘खिलखिलहाट’ ही रुग्णवाहिका योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर मुंबई उपनगर परिसर येथे ‘खिलखिलाहाट’ रुग्णवाहिका सुरू करणार आहे. जिल्ह्यातील समस्या जाणून घेवून त्यावर कार्यवाही करण्यात येइल.ज्या नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत त्यांच्या टोकन क्रमांकानुसार अर्ज निकाली काढू असे नागरिकांना सांगितले.

नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून त्यावर जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री यांनी सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

‘आर साऊथ वॉर्ड’ येथे उद्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’
६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, आपल्या तक्रारीच्या अर्जासह ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
शुक्रवार दि.७/१०/२०२२ रोजी आर साऊथ वॉर्ड येथे, शनिवार ०८/१०/२०२२ रोजी के ईस्ट वॉर्ड,सोमवार दि.१०/१०/२०२२ रोजी आर सेंट्रल वॉर्ड,बुधवार दि. १२/१०/२०२२ रोजी एल वॉर्ड,गुरुवार दि. १३/१०/२०२२ रोजी एस वॉर्ड,शुक्रवार दि.१४/१०/२०२२ रोजी एम ईस्ट वॉर्ड,शनिवार दि.१५/१०/२०२२ एच वेस्ट वॉर्ड,सोमवार दि.१७/१०/२०२२ रोजी आर नॉर्थ वॉर्ड येथे,बुधवार,दि १९/१०/२०२२ रोजी पी नॉर्थ वॉर्ड येथे,गुरुवार दि २०/१०/२०२२ रोजी पी साऊथ वॉर्ड येथे,सोमवार येथे ३१/१०/२०२२ रोजी एम वेस्ट वॉर्ड येथे,बुधवार दि.०२/११/२०२२ रोजी के वेस्ट वॉर्ड येथे,गुरुवार दि. ०३/११/२०२२ रोजी एच ईस्ट वॉर्ड येथे,शुक्रवार, दि. ४/११/२०२२ रोजी टी वॉर्ड येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील.नियोजित रोजी सकाळी १० वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात हा उपक्रम सुरु होईल. जिल्हाधिकारी: https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *