मुंबई काँग्रेसने गुरुवारी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून धारावीच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. या जागेवरून वर्षा गायकवाड यांना तिकीट मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीच्या जागांच्या वाटपात मुंबईत उत्तर …
Read More »मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यासाठीची तयारी संबंधित चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने केली असल्याची …
Read More »मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणा
महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थनी आणावे, असे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार …
Read More »पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर बोरघाटात आणि समतल भागात या वेगाने वाहने चालवा
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि कामाच्या निमित्ताने पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत आहे. त्यातच बोरघाट आणि समतल भागात प्रवासी वाहनांचा वेग आधीच निश्चित केला असल्याने अनेक वाहनांचा अपघात घडल्याचे आणि त्या अपघातातून अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसच्या वाहतूक शाखेकडून …
Read More »मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मतदानाची टक्केवारी ही राष्ट्रीय व राज्य सरासरीपेक्षा जास्त असावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा …
Read More »मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार
मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नाव नोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघर, देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, रिसेप्शन हा काही विवाह विधीचा भाग नाही
रिसेप्शन हा विवाह विधीचा भाग मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच असे सांगितले की, मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाला घटस्फोटाच्या खटल्याचा अधिकार नाही. कारण या जोडप्याने मुंबईत लग्नाचे रिसेप्शन केले होते आणि काही दिवस येथेच वास्तव्य केले होते. . “लग्नाचे सर्व विधी ७ जून २०१५ रोजी जोधपूर, …
Read More »चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाचा पदभार स्वाती म्हसे-पाटील यांच्याकडे
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी असलेल्या स्वाती म्हसे-पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी गुरुवारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. प्रशासनाचा गाढा अभ्यास असणाऱ्या स्वाती म्हसे-पाटील या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन १९९३ रोजी उप जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. त्यावर्षी …
Read More »महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित
महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब पडघे-कळवा सर्किट-१ मध्ये भार वाढल्यामुळे ठाणे, कळवा, वाशी, कलरकेम, महापे व टेमघर या परिसरात १६० मेगावॉट इतके विजेचे भारनियमन करावे लागले. महापारेषणची सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यान्वित झाल्याने वीजपुरवठा तातडीने पूर्ववत झाला. दरम्यान, महापारेषणचे अध्यक्ष व …
Read More »पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध
पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे खोटे पत्र प्रसारित केल्याबद्दल प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आचार संहिता व काय़दा विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.अखिलेश चौबे यांनी ही माहिती …
Read More »
Marathi e-Batmya