वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी

मुंबई काँग्रेसने गुरुवारी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून धारावीच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. या जागेवरून वर्षा गायकवाड यांना तिकीट मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

महाविकास आघाडीच्या जागांच्या वाटपात मुंबईत उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही जागांसाठी काँग्रेस सक्षम उमेदवारांच्या शोधात होती. यामध्ये उत्तर मध्यचे काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाची चर्चा होती, मात्र काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्या नावाला मंजुरी दिली. काँग्रेस उत्तर मुंबईच्या जागेसाठी उमेदवार शोधत आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना यांचा समावेश आहे. त्यापैकी चार आमदार महायुतीचे आहेत. वांद्रे पूर्वचे आमदार काँग्रेस पक्षातून जवळपास बाहेर पडले आहेत. कलिना विधानसभा मतदारसंघात संजय पोतनीस हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. अशा स्थितीत या जागेवर भाजपाच्या उमेदवाराविरोधात वर्षा गायकवाड यांना कसरत करावी लागणार आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. येथून आशिष शेलार, अमित साटम, खासदार पूनम महाजन यांच्या नावांची चर्चा आहे.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *