माजी केंद्रीय गृहसचिव आणि अनेक समित्यांचे प्रमुख राम प्रधान यांचे निधन ९२ व्या वर्षी वार्धक्यामुळे घेतला शेवटचा श्वास

मुंबई: प्रतिनिधी

माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज सकाळी ८.३० वाजता वार्धक्यामुळे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार आहे.

माजी केंद्रीय गृहसचिव होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतरच्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिले. स्व.राजीव यांच्या कार्यकाळात ते अरूणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. याशिवाय आसाम आणि मिझोरम राज्यात शांतता स्थापित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. निवृत्तीनंतर ते महाराष्ट्र सरकारकडून अनेक वादग्रस्त समित्यांची स्थापना करून त्यांच्या सूचना स्विकारल्या होत्या. २६-११ च्या हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. याशिवाय महाराष्ट्रातील पाणी प्रश्नी, विकास आदी प्रश्नांवरही त्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमण्यात आलेल्या होत्या.  तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे त्यांनी ट्रस्टी म्हणून काम पाहिले.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *