पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे उमेदवारी अर्ज मागे मात्र कपिल पाटलांना विरोध कायम - सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे

भिवंडीः प्रतिनिधी
भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे बाळ्यामामा यांनी बंडखोरी करत भरलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी अखेर मागे घेतला . शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानता सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता . मात्र सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष श्रेष्ठींनी सुरेश ( बाळ्यामामा ) म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज भरल्याच्या दिवशीच तडका फडकी सेनेच्या ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख पदावरून निलंबनाची कारवाई केली .
सुरेश म्हात्रे यांच्यावरील कारवाईने ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप पसरला होता . त्यानंतर शिवसेनेच्या पक्ष श्रेष्ठींकडून सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न झाला. अखेर पक्ष श्रेष्ठींच्या आग्रहाखातर सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी शुक्रवारी दुपारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला .
विशेष म्हणजे खासदार कपिल पाटील यांना आपला विरोध होता म्हणूनच आपण त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता . युतीला माझा कदापी विरोध नव्हता आणि नाही. मात्र ज्या कपिल पाटलांनी शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता, ज्या कपिल पाटलांनी शिवसैनिकांची आर्थिक , राजकीय कोंडी केली , ज्या कपिल पाटलांनी शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल केल्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या कपिल पाटलांनी शिवसेनेचा भगवा ध्वज जाळला त्या कपिल पटलांनाचा कट्टर शिवसैनिक म्हणून मी कदापी समर्थन करणार नाही . केवळ पक्ष श्रेष्ठींच्या आग्रहाखातर आपण आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे . मात्र अर्ज मागे घेतला असला तरी शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्या खासदार कपिल पाटील यांना आपला विरोध होता,आहे व कायम राहील अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी दिली आहे .
सुरेश म्हात्रे यांच्या या प्रतिक्रिये नंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या अडचणीत दुप्पटीने वाढ झाली आहे . तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घेतल्या नंतर सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) नेमकी कोणाचे समर्थन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *