प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणारी अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्याकरिता इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा ९०००/-रूपये एवढे विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे.  ज्या उमेदवार व उद्योजकांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगरशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये विविध आस्थापनांमध्ये- जसे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, लार्सन आणि टुब्रो लिमिटेड, टाटा कॅपिटल, टायटन इ. नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध  आहेत. या योजनेमुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी, व्यावसायिक नेटवर्क तयार होणे, आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकास यामध्ये यात होणे इत्यादी बाबांचा मोठा फायदा होणार आहे.

या योजनेचा तिसरा टप्पा  सुरू असून, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा  लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून रिक्तपदांसाठी अर्ज करावे. अधिकच्या माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर या कार्यालयाशी संपर्क साधावा. मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत-जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदोजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची माहिती

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही भारत सरकारची एक महत्वाची योजना असून,  युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव  देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम शिकण्याची आणि काही प्रमाणात उत्पन्न मिळवण्याची संधी देणारी सरकारी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे) सुरू केली आहे. यामध्ये तरुणांना देशातील टॉप २००० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते.

युवकांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे, त्यांची स्किल्स (कौशल्ये) वाढवणे. त्यांना नोकरीसाठी तयार करणे शिक्षण आणि प्रत्यक्ष काम यामधील अंतर कमी करणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. या योजनेत प्रतिमहा सुमारे ९,००० स्टायपेंड देण्यात येणार असून, ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप असेल. अनुभवामुळे पुढे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. हे विद्यावेतन हे थेट उमेदवाराच्या प्रथा बँक खात्यामध्ये डीबीटीव्दारे द्वारे जमा करण्यात येणार आहे. लाईफ ॲण्ड पर्सनल ॲक्सीडेंट इन्श्युरन्स देण्यात येणार आहे.

एकवेळीचे विशेष अनुदान म्हणून उमेदवारास रु.६,००० ची रक्कम डीबीटीद्वारे दोन हप्त्यांत दिली जाते. पहिल्या १५ दिवसांत ३,००० रूपये आणि दुसरे ३ महिने पूर्ण झाल्यानंतर ३,००० रूपये इंटर्नशिपच्या १५ दिवसांत दिले जातात. उमेदवारास सरकारकडून प्रधानमंत्री जीवन जोती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना योजनांद्वारे विमा संरक्षण दिले जाईल आणि कंपनीकडून अतिरिक्त फायदेही मिळू शकत्तात. योजनेसाठी वय साधारण १८ ते २५ वर्षे असावे. दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, पदवी, पदवीधर, बी.ई.. बी.टेक, इ.पदवीप्राप्त अर्ज करू शकतात. उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक तसेच सध्या फुल-टाईम नोकरी नसावी.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत  https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, उमेदवाराची नोंदणी पूर्ण झाल्यावर नामांकित कंपनीतील रिक्तपदांसाठी अर्ज करता येईल. ज्या उद्योजकांना प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत उमेदवार भरती करावयाचे आहेत अशा उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर या कार्यालयाशी संपर्क साधावा.

इस्रायल येथे रोजगाराची संधी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध असल्याची माहिती  मुंबई उपनगरचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी पत्रकाद्वारे दिली.

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक (इन्क्लुडिंग आजीटी) भारतीय प्राधिकरणाव्दारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग/ पोस्ट बीएससी नर्सिंग शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. वरील संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती लाभ व नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन सहायक आयुक्त शैलेश भगत, यांनी केले.

About Editor

Check Also

अतुल सावे यांचे आदेश, दिव्यांग कर्ज योजनेची मर्यादा वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करा ओबीसी विभागाच्या व्याज परतावा कर्ज योजनेच्या धर्तीवर योजना राबवावी

दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्ज योजनांची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे. राज्य दिव्यांग वित्त व विकास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *