काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या माफीबाबत… भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना स्पष्ट केली भूमिका

मराठी ई-बातम्या टीम

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रसाराला महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार ठरविले. पंतप्रधानांच्या या आरोपाच्या निषेधार्थ महाराष्ट्र काँग्रेसकडून भाजपा नेत्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. मागील वेळी नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर, काल भिवंडीमध्ये आणि आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकिय निवासस्थानासमोर काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी आधीच खबरदारी घेतल्याने काँग्रेसला सागर या बंगल्याजवळ जाता आले नाही. यावेळी भाजपाचे काही कार्यकर्त्येही सागर बंगल्यात तळ ठोकून राहीले होते. जर काँग्रेसचे कार्यकर्त्ये आले तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी.

दरम्यान काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मिल जायेगा’ अशा घोषणा यावेळी फडणवीसांसमोर देण्यात आल्या. काँग्रेसचा मोर्चा सागर निवासस्थानी आल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे हे कार्यकर्ते जमले होते. यावेळी फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले की, नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. माफी मागायची असेल तर देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसने मागावी.

कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शनं करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती काँग्रेसने या देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल मागावी. त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून ‘हमारा नेता कैसा हो, फडणवीस जैसा हो’ अशा घोषणा दिल्या.

भाजपाची गुंडगिरी दिसली पण ही संस्कृती आमची नाही

आमचं आंदोलन झाले आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण भाजपाच्या लोकांनी आज मुंबईकरांना अडवले. आम्हालाही गुंडगिरी करता येते, पण ही आमची संस्कृती नाही. भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला आहे. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, राज्यातील सर्व संपत्ती विकून गुजरातला नेली तरी चालेल पण आम्ही मोदींचं समर्थन करुन अशी भाजपाची वृत्ती असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड : काँग्रेस कार्यालयावर भाजपाचा मोर्चा म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची भाजपाच्या टिनपाट अमित साटमची लायकी नाही – खा. वर्षा गायकवाड

लाखो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला त्याचे उत्तर द्या, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना साथ देणाऱ्या भाजपाने काँग्रेसला अक्कल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *