प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पार पडणार संविधान सन्मान सभा शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या महासभेच्या वेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो लोकांनी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती.

त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा सज्ज होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही महासभा यंदा आणखी भव्य, प्रभावी आणि ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

या सभेत संविधानाच्या रक्षणाचा निर्धार, मनुवादाविरोधातील भूमिका आणि लोकशाही मूल्यांचे पुनरुज्जीवन याची चर्चा केली जाणार आहे. देशभरातून लाखो कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या मुंबईकडे रवाना होणार आहेत.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनाची विद्यार्थ्यांच्या मागण्या व समर्थनासाठी निघणाऱ्या मोर्चांना काँग्रेसचा पाठिंबा

आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *