शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका...आजही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक...

महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके माजलेत बोके… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… कुणी उद्योग घ्या, कुणी सबसिडी घ्या तुम्ही खोके घ्या… अशा घोषणा देत आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आज हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून गायरान जमीन आणि उद्योगमंत्र्यांनी केलेल्या अजब उद्योगाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली नववा दिवसही आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात गाजवून सोडला.

About Editor

Check Also

बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न रेल संख्या “झिरो वन फोर झिरो वन” प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *