कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी अपघातः आतापर्यंत ३० प्रवाशांचा मृत्यू एक्सप्रेस आणि मालगाडीचा लोका पायलट ठार, ६० जण जखमी

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात १७ जून रोजी सकाळी थांबलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. त्यामुळे कांचन गंगा गाडीचे मागील तीन डब्बे रूळावरून घसरले. तर कांचनगंगा एक्सप्रेसमधील जवळपास ३० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची तर ६० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दुपारपर्यंत हाती आली असून मालगाडीचा लोको पायलट (चालक) कांगचनगंगा एक्सप्रेस गाडीचा लोका पायलट दोघेही ठार झाल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे संचालकांनी दिली.

त्रिपुरातील आगरतळाहून पश्चिम बंगालमधील सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला काही अंतावर थांबविण्यात आले. काही कालावधीनंतर त्याच मार्गावरून येत असलेल्या मालगाडीने कांचनगंगा एक्सप्रेसला धडक दिली. त्यामुळे मागील तीन डबे रुळावरून घसरल्याने किमान ३० प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी न्यू जलपाईगुडी येथील रेल्वे अपघातस्थळी भेट देणार आहेत. उत्तर बंगालच्या न्यू जलपाईगुडी स्थानकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपानी स्थानकाजवळ मालगाडीच्या लोकोमोटिव्हने मागून दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातातील मृतांची सख्या वाढू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून कारण अजूनही आत अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या अनेक एजन्सी स्थानिकांसह युद्धपातळीवर काम करत आहेत. मृतांमध्ये मालगाडीचा पायलट आणि सहवैमानिकाचा समावेश आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, बचाव कार्य पूर्ण झाले आहे. मालगाडीच्या चालकाने सिग्नल ओव्हरशॉट केल्याने हा अपघात झाल्याचे सांगत मानवी चुकांमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

मालगाडीचा चालक आणि त्याच्या सहाय्यकासह कांचनजंगा एक्स्प्रेसच्या गार्डचा मृतकामध्ये समावेश आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून गाडीत अ़डकलेल्या प्रवाशांना वाचविण्याचे काम सुरु आहे.

मालगाडीने थांबलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला दिलेली धक इतकी भीषण होती की, धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसचे मागील तीन डबे रुळावरून घसरले आणि एक डबा हवेत उडाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पश्चिम बंगालमधील हा रेल्वेचा सर्वात मोठा असा दुसरा अपघात असून या मार्गावरही कवच यंत्रणा रेल्वे विभागाकडून बसविण्यात आली नसल्याची माहिती हाती आली आहे. या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *